Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र विरोधक मराठा समाजाला भडकवतायत - अजित पवार

विरोधक मराठा समाजाला भडकवतायत – अजित पवार

Related Story

- Advertisement -

मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित असल्याने त्यावर लवकरात लवकर तोडगा काढला जावा अशी मराठा समाजाची भावना आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दबातल ठरवल्याने हा रोष आता आणखी वाढत आहे. अशातच राज्यातील विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपने आरक्षण रद्द ठरल्याचे खापर थेट महाविकास आघाडी सरकारवर फोडलं आहे. यावर आता उपमुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांनी भाष्य करत विरोधक मराठा समाजाला भडकवण्याचे काम करत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.

आज फेसबुकद्वारे साधलेल्या संवादात मराठा आरक्षणाविषयी बोलताना त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. तसेच कशाप्रकारे समाजाला न्याय मिळवून देता येईल याबाबत त्यांनी भाष्य केले. “मराठा आरक्षण महाविकास आघाडीला टिकवता आले नाही, असे वातावरण विरोधक तयार करत आहेत.  हे साफ खोटं आहे. मी अतिशय स्पष्ट बोलणारा माणूस आहे हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. सर्वोच्च न्यायालायने यासंदर्भात निकाल दिला आहे. त्यामुळे पुन्हा न्यायालयाला आवाहन करणे त्यातून लोकसभा आणि पंतप्रधानांची मदत घेणे आमचा प्रयत्न आहे.

- Advertisement -

कारण नसताना समाजाला भडकवण्याचे काम विरोधी पक्ष करत आहेत. त्यामुळे माझी तमाम मराठा समाजातील जनतेला विनंती आहे कि त्यांनी वस्तुस्थिती काय आहे ती समजून घ्यावी. केवळ आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न  काहीजण करत आहेत”, असा टोला त्यांनी विरोधकांना हाणला. तसेच इतर समाजातील आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण मिळाले पाहिजे असा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वखाली महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. मराठा आरक्षणाविषयाची वस्तुस्थिती पंतप्रधानांना सांगितली, हे देखील अजित पवार यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

- Advertisement -