Maratha Reservation : मराठा आरक्षणावरील पुनर्विचार याचिका कोरोनामुळे पुढे ढकलली

मराठा आरक्षणावरील पुनर्विचार याचिका पुढे ढकलण्यात आली आहे. १२ जानेवारी रोजी यावर सुनावणी होणार होती. परंतु कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली आहे. पुनर्विचार याचिका विनोद पाटील यांनी दाखल केली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाकडून ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

मराठा आरक्षणावरील पुनर्विचार याचिका पुढे ढकलली

मराठा आरक्षण स्थगिती मिळाल्यानंतर माझ्यावतीने दाखल करण्यात आलेल्या रिव्हयू पिटिशनवरील सुनावणी उद्या १२जानेवारी रोजी होणार होती, परंतु सर्वोच्च न्यायालयात झालेला कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आल्याची माहिती याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी फेसबुकच्या माध्यमातून दिली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीच सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली होती. परंतु मराठा आरक्षण पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात पोहोचले आहे. तसेच सुप्रीम कोर्टामध्ये १२ तारखेला मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे, अशी माहिती विनोद पाटील यांनी दिली होती. मात्र, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ही सुनावणी सुप्रीम कोर्टाने पुढे ढकलली आहे.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केल्यानंतर याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी या प्रकरणी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. राज्य सरकारने आरक्षणासाठी जे काही करता येईल ते करावे. तसेच पुन्हा एकदा मराठा आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत, अशी विनंती विनोद पाटील यांनी केली होती.


हेही वाचा : Mumbai Police : विनामास्क फिरणाऱ्या १०० जणांवर कारवाई करण्यासाठी मुंबई पोलिसांना टार्गेट