घरमहाराष्ट्रMaratha Reservation : "अभ्यासकांनी त्यांचे विचार सोशल मीडियावर मांडण्यापेक्षा...", सरकारच्या अध्यादेशावर टीका...

Maratha Reservation : “अभ्यासकांनी त्यांचे विचार सोशल मीडियावर मांडण्यापेक्षा…”, सरकारच्या अध्यादेशावर टीका करणाऱ्यांना जरांगेंचे आवाहन

Subscribe

उद्या सकाळी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहे. रायगडाची पवित्र माती कपाळावर लावल्यानंतर मी पुन्हा अंतरवाली येथे येणार आहे, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.

रायगड : राज्य सरकारने दिलेल्या अध्यादेशामुळे मराठा समाजाची फसवणूक होत असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. यामुळे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या अध्यादेशावर टीका करणाऱ्यांवर प्रत्युत्तर दिले आहे. या अध्यादेशामुळे मराठा समाजाला कायदा झाला आहे. या कायद्यामुळे सगळ्या मराठ्यांना लाभ मिळणार आहे. मराठवाड्यातील काही लोक हे अफवा पसरवत आहात. अभ्यासक, कायदेतज्ज्ञ आणि वकिलांनी त्यांचे म्हणणे सोशल मीडियावर मांडण्यापेक्षा सरकार दरबारी मांडावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. “मराठवाड्यातील एकही मराठा आरक्षणाशिवाय वंचित राहणार नाही, असेही आश्वासन मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, “सरकारने काढलेल्या अध्यादेशनुसार सरकारने 15 दिवसांत लोकांचे म्हणणे मागितले आहे. मराठा आरक्षणाची माहिती असलेले जे अभ्यासक, कायदेतज्ज्ञ आणि वकील यांनी आपले म्हणणे सरकार दरबारी मांडावे. ज्यांना आरक्षणातील खाचखळगे माहिती आहेत, त्या सर्वांनी सरकार दरबारी येत्या 15 दिवसांत आपले म्हणणे मांडावे. सरकारने ‘सगेसोयरे’ हा शब्द फायनल केला आहे. ज्या मराठ्यांचा कुणबी म्हणून नोंदी सापडल्या नाहीत. त्या मराठ्यांसाठी सगेसोयरे शब्दाचा फायदा होणार आहे. या शब्दामुळे मराठ्यांचे कल्याण होणार आहे. तुम्ही तुमचे म्हणणे मांडल्यानंतर हा कायदा अजून मजबूत होईल, असेही मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – NCP MLA disqualification case : ‘दादा’ गटातील आमदार अपात्र करा; जयंत पाटलांच्या याचिकेवर आज ‘सर्वोच्च’ सुनावणी

रायगडाची पवित्र माती कपाळावर लावणार

मनोज जरांगे पाटील म्हणाले, “नव्या अध्यादेशानुसार पहिले प्रमाणपत्र मिळाल्यानंतर विजयसभा घेणार आहे. आज मी रायगड येथे मुक्कामी आहे. उद्या सकाळी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहे. रायगडाची पवित्र माती कपाळावर लावल्यानंतर मी पुन्हा अंतरवाली येथे येणार आहे”, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -