Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईला यश; अखेर 17 व्या दिवशी जरांगेंनी उपोषण घेतलं मागे

मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईला यश; अखेर 17 व्या दिवशी जरांगेंनी उपोषण घेतलं मागे

Subscribe

मागच्या 16 दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू होतं. आज त्यांच्या उपोषणाचा 17 वा दिवस होता. त्यांच्या उपोषण स्थळी जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिष्टमंडळाने भेट घेतली. जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री यांच्यात जवळपास 10 मिनिटं चर्चा झाली. त्यांच्या या चर्चेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून ज्यूस पिऊन जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण सोडलं आहे.

मागच्या 16 दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू होतं. आज त्यांच्या उपोषणाचा 17 वा दिवस होता. त्यांच्या उपोषणस्थळी जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिष्टमंडळाने भेट घेतली. जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री यांच्यात जवळपास 10 मिनिटं चर्चा झाली. त्यांच्या या चर्चेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून ज्यूस पिऊन जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण सोडलं आहे. आतापर्यंत जरांगे पाटील आणि सरकारमध्ये अनेक बैठका झाल्या. सरकारचं शिष्टमंडळ उपोषण सोडण्यासाठी तसंच जरांगे पाटल्यांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत प्रयत्नशील होतं, अखेर या सर्व चर्चांना यश आल्याचं दिसून येत आहे. (Maratha Reservation Success to the courtesy of the Chief Minister eknath Shinde Finally Manoj Jarange Patil called off their fast Jalna )

(हेही वाचा: ‘द्रमुक’मुळे ‘इंडिया’ आघाडीस कोणतेही तडे जाणार नाहीत, तर्क मांडत ठाकरे गटाचा दावा )

न्याय देतील ते फक्त एकनाथ शिंदेच

- Advertisement -

यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आपल्या या आंदोलनाला 29 ऑगस्टपासून सुरुवात झाली होती. तेव्हापासून हे आंदोलन सुरु आहे. राज्यातील ही पहिली घटना आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते पहिल्यांदा उपोषणस्थळी पोहचले आहेत. हे आपले यश आहे. तेव्हा तुमची टाळ्या वाया जाणार नाही जीव गेता तरी आरक्षणासाठी लढा सुरूच ठेवणार आहे. तेव्हा मराठा समाजाला न्याय देऊ शकतील ते फक्त एकनाथ शिंदेच असेही जरांगे पाटील म्हणाले.

जीव गेला तरी समाजासोबत गद्दारी करणार नाही

पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, समाजाच्या हिताचा निर्णय घेईल असे नेहमी सांगितले होते. प्रत्येक बैठकीत मुख्यमंत्री तुमचा विषय काढला. मराठा समाजाला तुमच्याकडून अपेक्षा आहेत. शिंदे हे आपल्याला मराठ्यांना न्याय मिळून देणार आहे. तर जीवाची राख रांगोळी झाली तरी मराठा समाजासोबत गद्दारी करणार नाही.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -