घरमहाराष्ट्रMaratha Reservation Survey : मराठा सर्वेक्षणासाठी शिक्षकांऐवजी विद्यार्थीच दिमतीला

Maratha Reservation Survey : मराठा सर्वेक्षणासाठी शिक्षकांऐवजी विद्यार्थीच दिमतीला

Subscribe

शिक्षकांऐवजी शाळेतील विद्यार्थ्यींच घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेतील विद्यार्थी गावात फिरून सर्वेक्षण करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

भंडारा : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे म्हणून आंदोलक मनोज जरांगे यांनी उपोषण, आंदोलन आणि मोर्चे काढले आहे. यानंतर राज्य सरकारने मराठ्यांच्या कुणबी नोंदणी सापडल्या आहेत. त्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली. पण ज्यांच्या कुणबी नोंदी नाहीत, त्या मराठ्यांसाठी ‘सगेसोयरे’ म्हणून सरकारने अध्यादेश काढला. यानुसार कुणबी नोंदी नसलेल्या मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे. दुसरीकडे सरकारकडून मराठा आरक्षणाच्या धर्तीवर खुल्या प्रवर्गातील नोंदी शोधण्यासाठी राज्यभर सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे.

राज्य सरकारच्या वतीने शहरी भाग आणि ग्रामीण भागात सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. हे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर देण्यात आली आहे. पण शिक्षकांऐवजी शाळेतील विद्यार्थ्यींच घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेतील विद्यार्थी गावात फिरून सर्वेक्षण करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Pawar Vs Pawar : शरद पवारांना सोडून प्रतिगामी शक्तींशी संगत…; रोहित पवारांचे ‘दादां’ना खरमरीत पत्र

चौकशी करून कारवाई केली जाईल

या व्हायरल व्हिडीओत लाखनी तालुक्यातील गोंडेगाव येथील शिक्षकांचे नाव मेंढे असून येथील विद्यार्थ्यांना शाळेत शिकवण्याऐवजी गावात फिरून सर्वेक्षण करत आहेत. या प्रकरणी जिल्हा परिषद शिक्षण सभापती यांनी विचारणा केली असून या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे सांगितले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – SSC Exam 2024: दहावीच्या परीक्षेबाबत मोठी अपडेट! ‘या’ तारखेपासून विद्यार्थ्यांना मिळणार Hall Ticket

या शिक्षकांना सरकारकडून वेतन घेतात. पण सर्वेक्षणाचे काम विद्यार्थ्यांनासोबत घेऊन करतात. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान असल्याची बाब नाकराता येत नाही. त्यामुळे या शिक्षकांवर काय कारवाई होईल, हे पाहणे महत्त्वाचे असेल.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -