सातारा : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. या आज मनोज जरांगे पाटील साताराच्या दौऱ्यादरम्यान खासदार उदयनराजे भोसले यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी उदयनराजे भोसले यांनी तलवार देऊन मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत केले. जातीनिहाय जनगणना करावी, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले, “तुझे कुटुंब आहे, त्याला तुझी गरज आहे. त्यामुळे तू जगला पाहिजे. आज मला सांगा की, त्याकाळात शिवाजी महाराजांनी कधी कुठलाही भेदभाव केले नाही आणि कोणाला अंतर दिले नाही. एक व्यक्ती एवढे करू शकतो. हा कशामुळे हे सर्व करत आहे. कारण त्यांच्यावर अन्याय झाला आहे. मी कोणत्याही जातीचे समर्थन करत नाही. पण आज मनोज जरांगे पाटील मरायला तयार आहे. पण त्याने कशाला मरायचे. जातीनिहाय जनगणना करा आणि कोणावर अन्याया करू नका. जे कोणी असतील त्यांना आरक्षण द्या”, अशी मागणी उदयनराजो भोसले यांनी केली आहे.
हेही वाचा – “मागासवर्ग आयोगाचे ऑफीस हजार स्क्वेअर फूट पण नाही”, संभाजीराजे छत्रपतींची खंत
उदयनराजे भोसले पुढे म्हणाले, “आज मराठा समाजची जी मानसिकता झाली. ती सर्व मराठा समाजाची आहे. कुठे तरी मला वाटत की, मेरिटवर आरक्षण दिले पाहिजे. माझा आणि यांचा (मनोज जरांगे पाटील) मुलगा ज्यावेळी कॉलेजला जातो. तेव्हा तिथे आरक्षणाचा विषय निघतो. आज जातीजातीत तेढ कोणी निर्माण केले. हे तुम्हीच शोधा”, असे ते म्हणाले.
जातपात सोडून द्या
“तुम्ही प्रश्न सोडवणार नसाल, तर माणसांनी कसे जगायचे, मग काय विष पिऊन आत्महत्या करायची का?, प्रत्येकाला मुले आणि कुटुंब ते जेव्हा शाळेत जातात. तिथे देखील आरक्षण आहे. त्यामुळे तुम्ही जनगणना करा आणि ज्यांना कोणाला आरक्षण द्याचे आहे. त्यांना आरक्षण देऊन टाका. मला फार काही बोलायचे नाही. हताश झालेले माणसे, जातपात सोडून द्या, महाराजांनी त्या काळात जात पाहिली नव्हती. जनगणना झाल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही”, असेही आवाहन उदयनराजे भोसले यांनी केले आहे.
हेही वाचा – ‘लढतांना गुन्हे दाखल झाले तर माझ्या आजोबांना अभिमान वाटेल’; आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा
देशाचे तुकडे करू नका
“प्रत्येकाला शिक्षण आणि जगण्याचा अधिकार आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचारणात आणा, असा सल्लाही उदयनराजे भोसलेंनी लोकांना दिला आहे. आपण सगळ्यांनी विचार करा आणि देशाचे तुकडे करू नका. खऱ्या अर्थाने देशाची वाट लागेल, असे आवाहन ही उदनराजे भोसलेंनी हात जोडून केले आहे.