Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र Maratha Reservation : 'वंशावळ दस्तावेज' शब्दात सुधारणा करेपर्यंत आंदोलन सुरुच राहाणार -...

Maratha Reservation : ‘वंशावळ दस्तावेज’ शब्दात सुधारणा करेपर्यंत आंदोलन सुरुच राहाणार – मनोज जरांगे

Subscribe

जालना : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या दृष्टीने सरकारने योग्य निर्णय घेतलेला आहे. त्यांच्या निर्णयाचे स्वागत करतो. मराठा समाजाला सरसकट कुणबी जातप्रमाणपत्र देण्याची आमची मागणी आहे. सरकारने बुधवारी जो निर्णय घेतला त्यामध्ये ‘वंशावळ दस्तावेजा’ची अट ठेवलेली आहे. ती अट रद्द करुन, सुधारीत अध्यादेश काढावा अशी मागणी मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले आंदोलक मनोज जरांगे यांनी केली आहे. जोपर्यंत सुधारीत अध्यादेश येत नाही तोपर्यंत उपोषण सुरुच राहाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

राज्य सरकारच्या अध्यायदेशासंदर्भात मनोज जरांगे म्हणाले, “राज्य सरकारने काढलेला अध्यायदेश मराठा समाज त्याचे स्वागत करतो. परंतु, ज्याच्याकडे वंशावळीच्या नोंदी असतील. त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाईल, असे उल्लेख सरकारच्या जीआरमध्ये असल्यामुळे आणि आमच्या कोणाकडेच वंशावळीचे दस्ताऐवजी नाहीत. त्यामुळे याचा आम्हाला एक टक्का ही फायदा होत नाही. जर वंशावळीचे पुरावे आमच्याकडे आहेत. आम्ही ते तसहसील ऑफिसला ते प्रमाणपत्र आम्ही स्वत: करू शकतो. त्याला आदेशाची अवश्यकता नाही. हा निर्णय घेण्याचे धाडस मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दाखविली आहे. याचे आम्ही स्वागत करतो. पण सरकारच्या या निर्णयाचा आम्हाला काही फायदा होणार नाही. याचा अर्थ आम्ही तुमची अडवणूक करतो असे नाही. आडवणूक ही प्रशासनाकडून होते. सरकारचा निर्णय चांगला आहे. आम्ही तो मान्य केला. फक्त सरकारने त्यांत सुधारणा करावी. मराठा समाजांनी तुमचा कालचा निर्णय मान्य केला. पण जिथे वंशावळीचा शब्द आला. वंशावळी ज्यांच्याकडे असतील, त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जातील. त्या दोन शब्दात सुधारणा करावी, ऐवढीच आमची विनंती आहे. सरसकट मराठा समाजाला कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी सुधारणा करावी, ऐवढी आमची मागणी आहे.”

न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती घटीत

- Advertisement -

मनोज जरांगे म्हणाले, “मराठा समाजला सरसकट कुणबी जातप्रमाणपत्र देण्यासाठी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती घटीत केली आहे आणि ही समिती एक महिन्याच्या आत अहवाल देणार आहे. यानंतर जो निर्णय येईल तो. आजची परिस्थिती पाहाता. आम्ही हट्टाला पेटलो नाही. पेटणार नाही आणि सरकारनेही पेटू नये. आमची मागणी ही मराठा सामजाला सरसकट प्रमाणपत्र देण्यात यावे ही आहे.”

हेही वाचा – Maratha Reservation : सरकार मराठा समाजाची दिशाभूल करतंय, जितेंद्र आव्हाडांचा आरोप

 ‘जीआर’ हा आमच्या भविष्याचा

- Advertisement -

आमच्याकडे नेमके वंशावळ नाही आणि आमची ती मागणी नाही. तुमचा जीआर एकदम चांगाल आहे. मराठ्यांनी त्याचे स्वागत पण केले. आम्हाला तुमच्या जीआर आवडला नाही, असे आम्ही कुठेही म्हटले नाही. तुमचा जीआर हा आमच्या भविष्याचा आहे. तुमचा जीआर हा आम्हाला न्याया देण्यासाठी आहे. यात कोणालाही शंका नाही. सरकारच्या जीआरमध्ये सुधारणा कारवी. ऐवढीच आमची मागणी आहे. वंशावळ असतील आणि सरसकट मराठा समजाला ऐवढे दोन शब्दात सुधारणा करा. आम्ही राज्य सरकारचे ऐकायला तयार आहे. आम्ही दहा पावले मागे येण्यासाठी तयार आहे. फक्त मराठा समाजाला सरसकट कुणबी जातप्रमाम पत्र देण्यात यावे. ऐवढीच आमची मागणी आहे.”

- Advertisment -