जालना : मराठा समाजाला राज्य सरकारने दिलेल्या दहा टक्के आरक्षण अमान्य असल्याचं म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या आंदोलनाची पुढची दिशा पुन्हा एकदा ठरवली. 24 फेब्रुवारीपासून दररोज रास्तारोको करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. तेव्हा राज्यात पुन्हा एकदा मराठा आंदोलक पेटण्याची शक्यता आहे. (Maratha Reservation The direction of the Maratha movement was decided Daily Rastraroko from February 24)
राज्य सरकारने 20 फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिल्याचं विधेयक संमत केलं. त्यानंतर मराठा आंदोलकांनी 21 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका जाहीर केली. यावेळी राज्यातील मराठा समाजात पिढ्यांपिढ्या जिथे परंपरेनुसार, लग्नाच्या सोयरीकी जुळतात त्या सगळ्या सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं. मराठा आणि कुणबी एकच असा अद्यादेश काढावा, अंतरवालीसह महाराष्ट्रातील सर्व गुन्हे सरसकट मागे घ्यावे आणि हैदराबादचे गॅझेट स्वीकारावे या मागण्यावर मनोज जरांगे पाटील ठाम असल्याचे ते यावेळी म्हणाले.
हेही वाचा : CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तत्परता, छत्रपती संभाजीनगरच्या मुलीचा वाचवला जीव
आमच्या व्याख्येनुसारच सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करावी नाही तर मराठा कुणबी हे एकच करणारा अध्यादेश काढावा अशी भूमिका त्यांनी यावेळी जाहीर केली. त्यानंतर आता मराठा आंदोलनाची पुढच्या दिशेबाबत बोलताना ते म्हणाले की, मराठा समाज बांधवानी आता प्रत्येक गावात 24 फेब्रुवारीपासून प्रशासनाला मागण्यांचे निवेदन द्यावे आणि दररोज सकाळी 10.30 ते दीड वाजेपर्यंत रास्तारोको करावा असेही त्यांनी सांगितले. तर 24 फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी राज्यभर रास्तारोको आंदोलन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : Pakistan Government : पाकिस्तानमधील सत्ता स्थापनेचा तिढा सुटला; शाहबाज शरीफ होणार पंतप्रधान
पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, शासकीय पदावर असलेल्या आमदार, खासदार मंत्री यांनी आपल्या दारावर येऊ देऊ नका, असे म्हणत आमदार आणि मंत्र्यांना अप्रत्यक्षपणे गावबंदी केली जाणार आहे. निवडणूक काळात आलेल्या मंत्र्यांच्या गाड्या वापस जाऊ देऊ नका, त्याची जाळपोळ न करता ताब्यात घेऊन निवडणुका संपल्यावर परत करा. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुका पुढे ढकलण्याचे यांना सांगितले पाहिजे, असे मनोज जरांगे म्हणाले.