Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaratha Reservation : "सरकारने काढलेली अधिसूचना अंतिम निर्णय नाही", चंद्रशेखर बावनकुळेंचे विधान

Maratha Reservation : “सरकारने काढलेली अधिसूचना अंतिम निर्णय नाही”, चंद्रशेखर बावनकुळेंचे विधान

Subscribe

चंद्रशेखर बावनकुळे हे सांगलीत भाजपाच्या लोकसभा निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्धाटनासाठी आले होते.

सांगली : सरकारने काढलेली अधिसूचना अंतिम निर्णय नाही. अधिसूचनेवर सरकारने हरकती आणि सूचना मागविल्या आहेत. यावर ओबीसी समाजाला आक्षेप नोंदवण्याची संधी आहे, असे विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. कुणबी नोंदी असणाऱ्या व्यक्तींच्या सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे. सरकारच्या निर्णयाविरोधात ओबीसीकडून विरोध होत आहे. याबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगलीत केलेल्यावर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

सगेसोयऱ्यांबाबत चंद्रशेखर बानकुळे म्हणाले, “सरकारने काढलेली अधिसूचना अंतिम निर्णय नाही. अधिसूचनेवर सरकारने हरकती आणि सूचना मागविल्या आहेत. या अधिसूचनेवर ओबीसी समाज आणि छगन भुजबळ यांना आक्षेप नोंदविण्याची संधी आहे. यावर सुनावणी होऊ अंतिम निर्णय होईल. पण त्यापूर्वी अधिसूचनेत काही दुरुस्ती करायच्या असतील, तर ते करण्याचा अधिकार सरकारचा आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – Congress on BJP: ‘EVM बनवणाऱ्या कंपनीत भाजपाचे चार नेते संचालकपदी; विरोधकांचा आरोप

पंतप्रधानांनी 10 वर्षात केलेल्या वचनपूर्ती

चंद्रशेखर बावनकुळे हे सांगलीत भाजपाच्या लोकसभा निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्धाटनासाठी आले होते. भाजपाने राज्यातील 48 जागांवर महायुतीच्या उमेदवारांना बळ देतील. आमचे सुपर वारीयर काम करतील, 50 हजार युनिट गाव चलो अभियान सुरू करणार आहे. भाजपा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 10 वर्षात केलेल्या वचनपूर्ती केली. पंतप्रपधानांनी केलेली कामे लोकांना पुढे घेऊन जाणे हाच आमचा अजेंडा आहे.”

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -