घरमहाराष्ट्रMaratha Reservation : आरक्षणाबाबत सरकारकडून अपेक्षित उत्तर नाही - बाळासाहेब थोरात

Maratha Reservation : आरक्षणाबाबत सरकारकडून अपेक्षित उत्तर नाही – बाळासाहेब थोरात

Subscribe

मुंबई : विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण एकमताने मंजूर झालेले आहे. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात ठिकाण्यासाठी सरकारने कोणती काळजी घेतली आहे. याबाबत विरोधकांनी सरकारला खुलासा करण्यासाठी पत्र पाठविले होते. पण राज्य सरकारने अपेक्षित असे उत्तर आले नाही, अशी खंत काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.

मराठा आरक्षणावर शंका उपस्थितीत केली जाते? या प्रश्नावर बाळासाहेब थोरात म्हणाले, “सरकारने अचानक एक दिवसाचे अधिवेशन बोलवण्यात आले. आमची कामकाज सल्लागार समितीची बैठक देखील झाली नाही. आमच्यासमोर विधेयक समोर आले होते. पण हे विधेयकात नेमके काय आहे हे आम्हाला समजले नव्हते. आम्ही विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र दिले होते. या पत्रात काही गोष्टींचा खुलासा करा, असे म्हटले होते. एक तास आधी कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. त्या सरकारने म्हटले होते की, आम्ही खुलासा करतो. पण सरकारने केलेला खुलासा फार काही समाधानकारक नव्हता. कारण दोन वेळेस हा प्रयोग झालेला आहे. ते यशस्वी झाले नाही तर, आता दिलेले आरक्षण हे कसे यशस्वी होणार आहे आणि जनतेची फसवणूक होणार नाही. यासाठी कोणती काळजी घेतली आहे, याबाबत सरकारने खुलासा अशी अपेक्षा आमची होती. पण सरकारने केला खुलास्याने आमचे समाधान झाले नाही.”

- Advertisement -

हेही वाचा – Maratha Reservation : आरक्षण टिकले तर मुख्यमंत्र्यांची खुर्ची टिकते; महाराष्ट्राचा हाच आहे इतिहास

विरोधकांना पाठविलेल्या पत्रात सगेसोयऱ्यांचा मुद्दा होता का? या प्रश्नावर बाळासाहेब थोरात म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. ही आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे. सगेसोयऱ्यांचा सरकारने खुलासा करणे अपेक्षित होते. पण सरकारकडे पाच-सहा लाख हरकती आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी आम्हाला दिली”, असा खुलासा सरकारने विरोधकांनी पाठविलेल्या पत्रावर दिला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -