घरमहाराष्ट्रMaratha Reservation: 'यापुढे महाराष्ट्रात मराठे राहणार नाहीत...'; भुजबळ संतापले, मागासवर्ग आयोगावर घणाघाती...

Maratha Reservation: ‘यापुढे महाराष्ट्रात मराठे राहणार नाहीत…’; भुजबळ संतापले, मागासवर्ग आयोगावर घणाघाती टीका

Subscribe

नागपूर: महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून राजकीय पेच निर्माण झाला आहे. अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. पण मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. यानंतर अनेकदा भुजबळ मराठा आरक्षणावरून आक्रमक भूमिका घेताना दिसले. मनोज जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यातही अनेकदा आरोप-प्रत्यारोप झाले. हा वाद काही मिटताना दिसत नाही. नागपूरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी मंत्री छगन भुजबळ पोहोचले आहेत. यादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणावर भाष्य केलं. (Maratha Reservation There will be no more Maratha in Maharashtra Chhagan Bhujbal got angry criticized the Backward Classes Commission)

राज्यात मराठा शिल्लक राहणार नाही

हिवाळी अधिवेशनात आदिवासी समाजाने चर्चेची मागणी केली आहे. यावर उत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले की, सगळेच मराठा समाजाचे लोक कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसींमध्ये येत आहेत. त्यामुळे आता राज्यात मराठा शिल्लक राहणार नाहीत.

- Advertisement -

मराठ्यांना कुणबी जात दादागिरीने लावली जात आहे. त्यामुळे जेव्हा जातपडताळणी केली जाईल तेव्हा ती देखील दादागिरीनेच होईल, असंही भुजबळ म्हणाले.

मागासवर्ग आयोग मराठा आयोग झालाय

छगन भुजबळ म्हणाले की, मागासवर्ग आयोग हा आता मराठा आयोग झाला आहे. त्यातील सगळेच राजीनामे देत आहेत. तसंच, जरांगे पाटलांविषयी बोलताना भुजबळ म्हणाले की, जरांगे पटालांना कोणीतरी उंचीवर घेऊन जात आहे. त्यांच्या मागण्या ऐकल्या जात आहेत. पण जरांगे पाटलांना कोणाचा पाठिंबा आहे. याविषयी मात्र त्यांनी काहीही उत्तर दिलं नाही.

- Advertisement -

(हेही वाचा: “आरोग्य विभागातील भ्रष्टाचाराचे पुरावे असून कारवाई केली नाही तर मुख्यमंत्री आरोपीच्या पिंजऱ्यात…” )

शिंदे समिती बरखास्त करा

शिंदे समिती करा अशी सुरुवातीला मागणी होती. मराठवाड्यातील मराठा लोक हे कुणबी असून प्रमाणपत्र मिळत नाही, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे त्या नोंदी तपासा आणि कुणबी प्रमाणपत्र द्या, असा या शिंदे समितीचा मूळ उद्देश होता. त्यासाठी तेलंगणातील कागदपत्र तपासावी, असे सांगण्यात आले. त्यासाठी काही लोकांची नेमणूक करायची होती. तेव्हा मला विचारले की, अशी एक समिती तयार करत आहोत. मी म्हटले काही हरकत नाही. त्यांना त्यांचे काम करू द्या. पण आता या समितीचे मराठवाड्यातील काम संपले आहे. त्यामुळे आता ही समिती बरखास्त करावी, असे स्पष्ट भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -