घरताज्या घडामोडीमराठा समाज मागास ठरवण्यासाठी नवा आयोग, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मेटेंची माहिती

मराठा समाज मागास ठरवण्यासाठी नवा आयोग, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मेटेंची माहिती

Subscribe

मुला-मुलींच्या भविष्याचा जो प्रश्न निर्माण झाला होता त्याबाबत महत्त्वाचा निर्णय होतो आहे.

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाच्या प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेतली असून लवकर मराठा समाज मागास ठरवण्यासाठी नव्या आयोगाची निर्मिती करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं असल्याचे मेटेंनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणाबाबत प्रलंबित प्रक्रिया येत्या ८ दिवसांत सुरळीत करण्यात येईल यामुळे मराठा आरक्ष मिळवण्याच्या दृष्टीने राज्य सरकार आता एक पाऊल टाकत असल्याची माहिती विनायक मेटे यांनी दिली आहे. ओबीसी आरक्षण आणि राज्य मागासवर्गीय आयोगाच्या नियुक्तीवरही चर्चा झाली असल्याची माहिती विनायक मेटे यांनी दिली आहे.

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. यानंतर विनायक मेटेंनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मराठा आरक्षण कायदेविषयक समितीचे अध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अन्य सचिव यांच्यासोबत मराठा समाजाचे गेलेलं आरक्षण कसं मिळवता येईल आणि मराठा समाजाचे इतर विषयांबाबत बैठक सविस्तरपणे दोन ते अडीच तास सुरु होती.

- Advertisement -

या बैठकीत अत्यंत चांगले निर्णय झाले आहेत. यामध्ये जे आरक्षण रद्द झाल्यामुळे जो अन्याय झाला, मुला-मुलींच्या भविष्याचा जो प्रश्न निर्माण झाला होता त्याबाबत महत्त्वाचा निर्णय होतो आहे. तो म्हणजे आरक्षण रद्द झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार नवीन आयोगाची स्थापना करुन मराठा समाजाला आरक्षण देता कसं येईल त्याकरता प्रक्रिया सुरु करण्याची गरज आहे. ती प्रक्रिया सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र कायदेशीरपणे चर्चा करुन येत्या ८ दिवसांत प्रक्रिया सुरु करण्यात येईल म्हणजे मराठा आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने पाऊल टाकलं आहे अशी माहिती विनायक मेटे यांनी दिली आहे.

वडेट्टीवार समाजामध्ये भांडण लावताहेत

काँग्रेस नेते विज वडेट्टीवार यांना कोणीतरी सुपारी दिली आहे. यामुळे ते समाजामध्ये भांडण लावत आहेत. वातावरण भंग करत आहेत. तंटे लावण्याचे काम करतायत आणि त्यांचे प्रदेशाध्यक्ष काहीही बोलत नाही. काँग्रेसचा ओबीसी-मराठा समाजामध्ये भांडण लावण्याचा काँग्रेसचा अजेंडा आहे का? असा सवाल विनायक मेटे यांनी उपस्थित केला आहे. काल बैल पोळा झाला यामुळे या बैलांना मोकाट सोडलंय का? असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारणार असल्याचे भेटीपुर्वी विनायक मेटे यांनी म्हटलं होते.

- Advertisement -

हेही वाचा : रुग्णालयं उघडू की मंदिरं उघडू?, मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -