घर महाराष्ट्र आरक्षण मिळणारच, पण आता उपोषण थांबवा...; भिडे गुरुजींची जरांगे पाटलांना विनंती

आरक्षण मिळणारच, पण आता उपोषण थांबवा…; भिडे गुरुजींची जरांगे पाटलांना विनंती

Subscribe

भिडे गुरूजी म्हणाले की, जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश येणारच, पण आता उपोषण थांबवायला हवं सोबतच लढा सुरू ठेवला पाहिजे. भिडे म्हणाले की, आता मागे वळून पाहायचं नाही, जसं पाहिजे तसं मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. जरांगे तुमचं आम्हाला कौतुक वाटत आहे. तुमचा विजय नक्की होणार आहे. पण तुम्ही उपोषण थांबवा अशी मी तुम्हाला विनंती करतो, असं भिडे गुरूजी म्हणाले.

मागच्या 15 दिवसांपासून मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. जालन्यात झालेल्या लाठीचार्जनंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे. जरांगे पाटीलांची सरसकट सर्व मराठा बांधवांना कुणबी जात प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्याची मागणी आहे. ते त्यांच्या मागणीवर अजूनही ठाम आहेत. आता त्यांनी हे उपोषण थांबवावं म्हणून शिवप्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष संभाजी भिडेही उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. (Maratha reservation Will get reservation but stop hunger strike now sambhaji Bhide Guruji s request to Jarange Patil )

भिडे गुरूजी म्हणाले की, जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश येणारच, पण आता उपोषण थांबवायला हवं सोबतच लढा सुरू ठेवला पाहिजे. भिडे म्हणाले की, आता मागे वळून पाहायचं नाही, जसं पाहिजे तसं मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. जरांगे तुमचं आम्हाला कौतुक वाटत आहे. तुमचा विजय नक्की होणार आहे. पण तुम्ही उपोषण थांबवा अशी मी तुम्हाला विनंती करतो, असं भिडे गुरूजी म्हणाले. तसंच, यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार , देवेंद्र फडणवीस हे आपल्या भूमिकेवर ठाम राहतील, असा विश्वासही व्यक्त केला.

- Advertisement -

(हेही वाचा: जरांगे पाटलांचे आंदोलन मोडून काढण्याचा डाव, कारण…; संजय राऊतांचा गौप्यस्फोट)

संभाजी भिडे मनोज जरांगेंना पुढे म्हणाले की, तुमच्या या तपश्चर्येला 100 टक्के यश येणार, यशस्वी होईल. सत्ताधारी जे शब्द देतील तो पाळून घ्यायचं काम माझ्यावर सोपवा, असं म्हणत त्यांनी आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी स्वत:वर घेतली.

- Advertisement -

तसंच, भिडे गुरूजी पुढे म्हणाले की, मराठ्यांना आरक्षण मिळावं ही एक लढाई आहे. एक घाव दोन तुकडे असं हे काम नाही, याला वेळ लागणार. जरांगे पाटील जे करत आहेत, ते संपूर्ण समाजासाठी करत आहेत. परंतु, आता हे उपोषण थांबवून लढा द्यायला हवा. हा लढा लढत असताना आमचे प्रमुख कोण असणार तर जरांगे पाटील, असं म्हणत भिडे गुरूजी यांनी जरांगे पाटलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

भिडे गुरुजी पुढे म्हणाले की, मराठा हा या समाजाचा पाठीचा कणा आहे. आरक्षण हे मिळणारच, असं म्हणत त्यांनी मनोज जरांगेंना उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे.

- Advertisment -