घरमहाराष्ट्रMaratha Reservation : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकार विशेष अधिवेशन बोलवणार?

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकार विशेष अधिवेशन बोलवणार?

Subscribe

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे 10 फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. पण मनोज जरांगेंनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.

मुंबई : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर 16 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलवण्याचा निर्णय सरकार घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या विशेष अधिवेशनावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
 
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासाठी दिलेल्या निर्णयावर पुनर्विचार याचिका सरकारकडून दाखल करण्यात आली. या आरक्षणावर सुनावणी सुरू आहे तर, दुसरीकडे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंनी उपोषण केले होते आणि नंतर अंतरवाली सराटी ते मुंबई पायी दिंडी यात्रा देखील काढली होती. यानंतरच ‘सगेसोयऱ्यांना’ देखील कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत जीआर सरकारने काढला.
 
 
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहात राज्यपाल रमेश बैस यांचे अभिभाषण होते. यानुसार, राज्याचे अर्थसंकल्पी अधिवेशन हे वर्षाच्या सुरुवातीला असते. या अधिवेशनात राज्यपालांचे अभिभाषण होत. त्यापूर्वीच मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्यात येण्याची शक्यता आहे.  या अधिवेशनात राज्यपालांचे अभिभाषण होईल, अशी शक्यता वर्तवली आहे. या विशेष अधिवेशनात 16 फेब्रुवारीला विशेष अधिवेशनात मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडणार असून तो स्वीकारण्यात येईल, अशी शक्यता आहे. मराठा आरक्षणाचे विधेयक मांडण्याची शक्या आहेत.
 
 
मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषण सुरू
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे 10 फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. पण मनोज जरांगेंनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.
 
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -