घरमहाराष्ट्र"मराठा समाजाने ओबीसीऐवजी...", संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांची भूमिका

“मराठा समाजाने ओबीसीऐवजी…”, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांची भूमिका

Subscribe

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मागणी केली आहे. पण ओबीसीमधून आरक्षण देण्यास ओबीसींच्या नेत्यांनी विरोध केला आहे. यामुळे राज्यात मराठा आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांमध्ये वाद सुरू आहे. मराठा समाजाने ओबीसीऐवजी ईडब्ल्यूएसमधून आरक्षण घ्यावे. कारण याचा मराठ्यांना अधिक फायदा होईल, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी मांडली आहे.

ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण द्यावे, या मागणीवर प्रवीण गायकवाड म्हणाले, “जर मराठा समाजला ओबीसीमधून आरक्षण मिळाले. तर मराठ्यांना खूप कमी वाटा मिळेल. कारण ओबीसींना मिळाणाऱ्या आरक्षणापैकी 18 ते 19 टक्के हे कुणबी समाजाला मिळते. यामुळे ईडब्ल्यूएसमधून मराठ्यांना 10 टक्के ते 8 टक्के ऐवढे आरक्षण मराठा समाजाला मिळण्याची शक्यता आहे”, असे प्रवीण गायकवाड सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – बिहारमध्ये जे शक्य ते महाराष्ट्रात का नाही? आरक्षणाची मर्यादा वाढवा; अशोक चव्हाणांचा सरकारला सल्ला

त्याचबरोबर अखिल भारतीय मराठा महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांनी मंडल आयोगाला विरोध करत ओबीसी आरक्षणाला विरोध करत आर्थिक निकषावरील आरक्षणाची मागणी केली. 1967 पूर्वीच्या दस्ताऐवजा आधारे आरक्षण घेतले जाऊ लागले. पण मराठा आणि कुणबी या दोन्ही स्वतंत्र जाती असल्याने जातीचा दाखल देणाऱ्या अधिकाऱ्यांसमोर प्रश्न निर्माण होऊ लागले, असेही प्रवीण गायकवाड म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -