Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी काय घोडे मारलेत का? आरक्षणावरून पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी काय घोडे मारलेत का? आरक्षणावरून पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

Subscribe

मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी दाखला देण्याबाबत निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयाला ओबीसी, कुणबी समाजाने विरोध केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे

मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी दाखला देण्याबाबत निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयाला ओबीसी, कुणबी समाजाने विरोध केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. (  Marathas of Western Maharashtra Prithviraj Chavan s question on reservation of Marathawada Maratha and blaimed CM Eknath Shinde and devendra Fadnavis  )

मराठवाड्यातल्या मराठा समाजाला मागासवर्गीय आरक्षण दिले, तर मग पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी काय घोडे मारले आहेत का? अस सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री शिंदेंना केला आहे. सांगलीमध्ये काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेत ते माध्यमांशी संवाद साधत होते. मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत फारच चुकीचा निर्णय घेतला असल्याची टीका चव्हाणांनी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या टीकेला चव्हाणांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?

- Advertisement -

अजित पवारांना पक्षांतरामुळे विसर पडलेला दिसतोय की मी मुख्यमंत्री असताना आपण सर्वप्रथम मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि त्यावेळी ते माझ्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते असे चव्हाण म्हणाले. ज्यांच्याकडे निजामकालीन कागदपत्र, दाखले पुरावे आहेत त्याला ओबीसीमध्ये आरक्षण घ्यायचं आणि ज्यांच्याकडे पुरावे नाहीत, असे गरीब लोक ज्यांना राहायला घर नाही ते पुरावा कुठे सांभाळत बसणार. अशा पद्धतीने आता मराठवाड्यातल्या मराठा समाजाचे दोन भाग सरकारने केलेले आहेत. आज सरकार निजामकालीन कागपत्र, पुरावे दाखले ग्राह्य धरत आहे पण शाहू महाराजांचे दाखले सरकार ग्राह्य का धरत नाही, हा कोणता न्याय आहे, असं म्हणत यावरही पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्षेप घेतला आहे. आता दिल्लीमध्ये पण भाजप सरकार आणि महाराष्ट्रातदेखील भाजप सरकार आहे. त्यामुळे भाजपने आता हा मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला पाहिजे, असंही चव्हाण म्हणाले.

चव्हाण म्हणाले की, आम्ही आरक्षण दिलं आणि त्यावेळी कोणीतरी कोर्टात गेलं आणि ऑक्टोबरमध्ये आमचं सरकार गेलं. मात्र नंतर जे देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं त्यांनी मात्र कोर्टामध्ये या केसचा पाठपुरावा ज्या ताकदीने करायला हवा तसा केला नाही. खरं म्हणजे कोर्टाकडे आणखी मुदत मागायला हवी होती. मात्र, त्यांनी स्पष्टपणे आरक्षणाचा पराभव होऊ दिला, असा आरोप आता चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: जंत्र-तंत्र-मंत्र जादूटोणा यातच अडकलेत…; भीमाशंकर यात्रेवरून राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला )

- Advertisment -