घरट्रेंडिंग"परत जाऊ नका…''; एकनाथ शिंदेंचे ट्विट रिट्वीट करत 'या' अभिनेत्याने दिली प्रतिक्रिया

“परत जाऊ नका…”; एकनाथ शिंदेंचे ट्विट रिट्वीट करत ‘या’ अभिनेत्याने दिली प्रतिक्रिया

Subscribe

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंच्याऐवजी आमदार अजय चौधरी यांची शिवसेनेच्या विधान भवनातील गटनेतेपदी नियुक्ती केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी एक ट्वीट केले.

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंच्याऐवजी आमदार अजय चौधरी यांची शिवसेनेच्या विधान भवनातील गटनेतेपदी नियुक्ती केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी एक ट्वीट केले. यामध्ये त्यांनी “आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही”, असे म्हटले आहे. त्यांचे हेच ट्वीट मराठी अभिनेता आरोह वेलणकर (marathi actor aroh welankar) याने रिट्विट केले आहे. अभिनेता आरोह वेलणकर याने एकनाथ शिंदेंचे ट्विट रिट्वीट केल्याने मनोरंजन क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे. (marathi actor aroh welankar share comment on eknath shinde tweet)

शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर नॉट रिचेबल होते. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची विधान भवनाच्या गटनेते पदावरून हकालपट्टी केली.

- Advertisement -

एकनाथ शिंदेंचे ट्विट (eknath shinde tweet) रिट्विट करत, ‘परत जाऊ नका आता म्हणजे मिळवलं’, असे म्हटले आहे. तसेच, “संपूर्ण राज्य आणि महाराष्ट्रातील मतदारांनी महाविकासआघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi Government) झालेला गोंधळ आणि अनागोंदी पाहावी. अनेक मराठी वाहिन्यांवर एकनाथ शिंदेंसोबत १२ शिवसेना आमदार नॉट रिचेबल (MLA not reachable) असल्याचे सांगण्यात येत आहे. नक्कीच काहीतरी मोठं घडणार”, असेही ट्विट आरोह वेलणकरने केले.

आरोह वेलणकरने केलेल्या ट्विटवर अनेक नेत्यांनी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी त्यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी आरोहला ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला आहे. दरम्यान, मराठी अभिनेता आरोह वेलणकर हा नेहमी विविध राजकीय विषयांवर मत मांडताना दिसतो. सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो.

- Advertisement -

“आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही”, असे ट्विट एकनाथ शिंदेंनी केले आहे.


हेही वाचा – नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाच्या नात्यावर समंथाने दिलं सडेतोड उत्तर

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -