घरमहाराष्ट्रमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली होणार 'मराठी भाषा भवन' निर्मितीचे काम

मंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली होणार ‘मराठी भाषा भवन’ निर्मितीचे काम

Subscribe

मराठी भाषेचा विकास आणि संवर्धनासाठी चर्नी रोड येथे सात मजली मराठी भाषा भवन उभारण्यात येणार आहे. या इमारतीची अंतर्गत रचना आणि भाषिक संग्रहालायाच्या निर्मितीसाठी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

या समितीमध्ये तीन वेगवेगळे विभाग करण्यात आले आहेत. मराठी भाषा भवनात मराठी भाषेची अभिजातता आणि कालखंडनिहाय समृध्दतेची ओळख निर्माण करुन देणारे भाषिक तसेच वस्तू संग्रहालय निर्माण करण्यात येणार आहे.गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते या नियोजित इमारतीचे भूमीपूजन झाले होते. या मराठी भाषा भवनात ग्रंथ, दस्ताऐवज,पुरावे कोणते ठेवावे यासाठी राज्य सरकारला मार्गदर्शन करण्यासाठी साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे , राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळाचे अध्यक्ष राजा दीक्षित , भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, भाषा सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले, ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे, अभिजात मराठी भाषा समितीचे माजी सदस्य हरी नरके, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक पदसिध्द सदस्य असतील.

- Advertisement -

या समितीमध्येच मराठी भाषा भवनाची अंतर्गत रचना आधुनिक आणि अद्यावत व्हावी यासाठी राज्य सरकारला मार्गदर्शन करण्यासाठी छत्रपतीत शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयचे व्यवस्थापकीय संचालक सव्यसाची मुखर्जी आणि पुरातत्वे व प्रदर्शने विभाग संचालक पदसिध्द सदस्य असतील. या भाषिक वस्तूसंग्रहालयासाठी मराठी भाषेचा इतिहास आणि मराठी भाषाविज्ञान यासाठी प्रा. रेणुका ओझरकर, मराठी भाषा अभ्यासक गणेश देवी, भूपाल रामनाथकर यांची समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.

चर्नी रोड येथे सुमारे २ हजार १०० चौरस मीटर जागेवर मराठी भाषा भवनाची सात मजली दिमाखदार वास्तू उभी राहणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १२६ कोटी रुपये खर्च होणार आहेत. या वास्तूमध्ये २०० आसन क्षमतेचे बहुउद्देशीय सभागृह, १४५ प्रेक्षकांची क्षमता असलेले अॅम्फी थिएटर, चार मजल्यांवर प्रदर्शनासाठी जागा आणि एक मजला प्रशासकीय आणि कार्यालयीन जागा असेल.


CBSE Syllabus : सीबीएसईचा 10वी, 12वीचा अभ्यासक्रम जाहीर; आता 2 टर्ममध्ये होणार नाहीत परीक्षा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -