घरमहाराष्ट्रमराठी छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा; तिला अभिजात दर्जा द्या!

मराठी छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा; तिला अभिजात दर्जा द्या!

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची केंद्रावर टीका

मराठी ही महाराष्ट्राची भाषा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा आहे. छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर तुम्ही दिल्लीच्या तख्तावर टेकू शकत आहात, ते टेकू शकला असता? बसू शकत आहात, ते बसू शकला असतात? एवढे जरी कळले, तरी अभिजातच काय, सर्वोत्तम सर्वोच्च दर्जा देण्यासाठी एवढी एकच गोष्ट पुरे, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर केली.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने विधान मंडळातील वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि मराठी भाषा विभाग, मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित परिसंवादाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. इंग्रजी आली पाहिजे, आम्हाला दुसर्‍या भाषेचा दुस्वास करायचा नाही; पण त्यामुळे माझी भाषा कमकुवत होता कामा नये, याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. वर्षामागून वर्ष जात आहेत. अजून मराठी भाषेला अभिजात भाषेची मान्यता मिळत नाही.

- Advertisement -

गेल्या वर्षी मी उद्वेगाने म्हटले, जे दिल्लीत दर्जा देणारे किंवा नाकारणारे बसले आहेत, त्यांच्या लक्षात एक गोष्ट आणून द्यायला हवी किंवा अगदी खडसावून सांगितले पाहिजे, ही आमची मातृभाषा आहे व आम्हाला तिचा अभिमान आहेच, असे मुख्यमंत्री म्हणाले. इंग्रजी आली पाहिजे, आम्हाला दुसर्‍या भाषेचा दुस्वास करायचा नाही; पण त्यामुळे माझी भाषा कमकुवत होता कामा नये, याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी पुढे या
मराठी भाषा दिन म्हटले की फक्त एकच दिवस मराठी भाषेचे प्रेम उचंबळून येणे चुकीचे. मराठी ही आपल्या रोमारोमात भिनलेली भाषा आहे. माझी माती, माझी माता, माझी मातृभूमी.. माझी मातृभाषा हा आपल्यासाठी अभिमानाचा गौरवाचा विषय असून हा गौरव जपणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. याच भावनेतून पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याच्या एका ध्येयाने एक होऊन पुढे जाऊया. मग पाहू छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भाषेला, महाराष्ट्राच्या या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळत नाही?, असा सवालही त्यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -