घरताज्या घडामोडीVideo: मनसेनं करुन दाखवलं, Amazon App आता मराठी भाषेत, जेफ बेझोसनी घेतली...

Video: मनसेनं करुन दाखवलं, Amazon App आता मराठी भाषेत, जेफ बेझोसनी घेतली दखल

Subscribe

दिवाळीपुर्वी ऑनलाईन सेलच्या माध्यमातून करोडोंची माया जमविणाऱ्या ई-कॉमर्स साईट्सना मनसेने मराठीमध्ये App आणण्यासाठी दणका दिला होता. अ‍ॅमेझॉन व फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांच्या अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा उल्लेख नाही. त्यामुळे मनसेने गुरुवारी या दोन्ही कंपन्यांच्या मुंबईतील मुख्यालयांना भेट देत सात दिवसांत अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश न केल्यास तुम्हाला दिवाळी धमाका नाही तर मनसे धमाका दाखवू असा इशारा दिला होता. तसेच मनसेचे चिटणीस अखिल चित्रे यांनी अ‍ॅमेझॉनच्या बीकेसी येथील कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठकही घेतली. मनसेच्या आंदोलनाच्या पवित्र्यानंतर आता अ‍ॅमेझॉन App मराठी भाषेच्या वापरास समंती देण्यात आली आहे. अ‍ॅमेझॉनचे सर्वेसर्वा जेफ बेझोस यांनी मनसेच्या ईमेलची दखल घेतली असून आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून रिप्लायही दिला आहे.

अ‍ॅमेझॉनच्या कायदे अधिकाऱ्यांशी सकारात्मक बैठक पार पडल्यानंतर अखिल चित्रे यांनी मनसेने आंदोलन मागे घेतले असल्याचे सांगितले. कंपनीचे संस्थापक जेफ बेझोस हे मराठी भाषेचा वापर करण्यास सकारात्मक आहेत. अ‍ॅमेझॉन App मध्ये यापुढे शंभर टक्के मराठी भाषेचा वापर करण्यात येणार आहे. तसे पत्र येत्या दोन दिवसांत अ‍ॅमेझॉनकडून मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या नावाने जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल चित्रे यांनी दिली.

- Advertisement -

ई-कॉमर्स क्षेत्रात अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही कंपन्यांचे मोबाईल अ‍ॅप आहे. या अ‍ॅपमध्ये इंग्रजी, हिंदी, तमिळ, मल्याळम, कन्नड यासारख्या अनेक भाषांचे पर्याय दिले आहेत. मात्र मराठी भाषेचा पर्याय दिलेला नाही. अनेक मराठी भाषिक या अ‍ॅपचा वापर करतात. खासकरुन दिवाळी सारख्या डिस्काऊंट फेस्टिवलमध्ये मराठी लोकांकडून कोट्यवधीचा व्यापार मिळतो. मग महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा पर्याय दिला पाहीजे, अशी भूमिका मनसेची होती. ७ दिवसांत अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून दिला नाही. तर दिवाळी धमाक्याऐवजी कंपनीला आम्ही मनसेचा धमाका दाखवू असा इशारा मनसेचे महापालिका कर्मचारी कामगार सेनेचे सरचिटणीस अखिल चित्रे यांनी दिला होता.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -