घरताज्या घडामोडीमराठी सिनेमांना थिएटर न मिळण्यावर सरकारचा 'हा' मोठा निर्णय

मराठी सिनेमांना थिएटर न मिळण्यावर सरकारचा ‘हा’ मोठा निर्णय

Subscribe

एखाद्या चित्रपटगृहाने वर्षातून जर चार आठवडे मराठी चित्रपट दाखवले नाहीत तर त्याला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. याबाबत मुनगंटीवार यांनी ट्वीट करत माहिती दिली.

मागील काही दिवसांपासुन मराठी सिनेमाला थिएटर मिळत नसल्याने वातावरण तापले आहे. मराठी चित्रपट दर्जेदार असूनही त्यांना आपल्याच राज्यात स्क्रीन्स मिळत नाहीत ही तक्रार मराठी निर्मात्यांची असते. या पार्श्वभूमीवर आता राज्याच्या सांस्कृतिक खात्याने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (marathi movie fine theater owners 10 lakhs if they do not show marathi films for four weeks in a year)

एखाद्या चित्रपटगृहाने वर्षातून जर चार आठवडे मराठी चित्रपट दाखवले नाहीत तर त्याला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. याबाबत मुनगंटीवार यांनी ट्वीट करत माहिती दिली.

- Advertisement -

मराठी सिनेमांना सिनेमागृहांमध्ये प्राईम टाईम उपलब्ध करुन देण्याबाबतची बैठक आज मंत्रालयात सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला गृह विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, दादासाहेब फाळके चित्रनगरीचे सहव्यवस्थापकीय संचालक कुमार खैरे, सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव विद्या वाघमारे, मराठी सिनेमांचे निर्माते, दिग्दर्शक तसेच सिनेमागृहांचे मालक आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मराठी चित्रपट प्राईम टाईमला उपलब्ध करुन देणे आणि पुरेशा स्क्रीन्स मिळाव्या यासाठी आता राज्य सरकारने पुढाकार घेतल्याचं दिसून येतंय. त्याचाच एक भाग म्हणून वर्षातून चार आठवडे मराठी चित्रपट दाखवले नाहीत तर चित्रपटगृह मालकांना परवाना नुतनीकरणावेळी 10 लाख रुपयांचा दंड लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या संदर्भात गृह विभागाला अधिसूचना देण्याचा निर्णय करण्यात आला. तसेच सिंगल स्क्रीन चित्रपट गृहामध्ये भाडे वाढवू नये असाही निर्णय घेण्यात आला.

- Advertisement -

“महाराष्ट्रात मराठीसह अन्य विषयांचे अनेक सिनेमे प्रदर्शित होत असतात. पण गेल्या काही वर्षांपासून मराठी सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर काही सिनेमांना थिएटर मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी येत असतात. त्यामुळेच येणाऱ्या काळामध्ये थिठएटरांमध्ये मराठी सिनेमा प्रदर्शित करण्यासंदर्भातील कार्यप्रणाली तयार करण्यात येईल. मराठी चित्रपटांसबंधी निश्चित कार्यप्रणाली करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग पुढाकार घेणार असून यासाठी गृह विभागासह विविध विभागांचे समन्वय आवश्यक असणार आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना सिनेमागृहांमध्ये मराठी सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी स्वतंत्र कार्यप्रणाली करण्यात येईल”, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

दरम्यान, या बैठकीत सुधीर मुनगंटीवार यांनी येत्या 15 दिवसांमध्ये मराठी सिनेमा निर्मात्यांनी आपली निवेदने द्यावीत जेणेकरुन याविषयाबाबत विस्तृत बैठक 15 जूननंतर घेण्यात येईल असेही सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


हेही वाचा – विमानात विडी ओढणाऱ्या प्रवाशाला अटक; दिलेल्या माहितीने पोलिसही चक्रावले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -