Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रमराठवाडाPolitics : मुंडेंकडून देशमुख पिता-पुत्रावर कारवाईची मागणी; राजेसाहेब देशमुखांकडून स्पष्टीकरण

Politics : मुंडेंकडून देशमुख पिता-पुत्रावर कारवाईची मागणी; राजेसाहेब देशमुखांकडून स्पष्टीकरण

Subscribe

परळी विधानसभा  मतदारसंघातील मतदान केंद्र फोडल्याप्रकरणी देशमुख पिता-पुत्रावर कारवाई करावी, अशी मागणी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. याप्रकरणी आता शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना धनंजय मुंडे यांच्यावरच आरोप केले आहेत.

बीड : राज्यात अनेक ठिकाणी बुधवारी (20 नोव्हेंबर) विधानसभा निवडणुकीसाठी शांततेत मतदान पार पाडलं, मात्र काही ठिकाणी गोंधळ, कार्यकर्त्यांमध्ये राडा आणि ईव्हीएम मशिनची मोडतोड असे अनेक प्रकार घडले. परळी विधानसभा  मतदारसंघातील मतदान केंद्र फोडल्याप्रकरणी देशमुख पिता-पुत्रावर कारवाई करावी, अशी मागणी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. याप्रकरणी आता शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना धनंजय मुंडे यांच्यावरच आरोप केले आहेत. (Accusations and counter-accusations between Dhananjay Munde and Rajesaheb Deshmukh over the vandalism of a polling station)

राज्यभरात मतदानाची प्रक्रिया पार पडत असताना परळी शहरातील बँक कॉलनी परिसरात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माधव जाधव यांना मारहाण झाली होती. यानंतर याचे पडसाद घाटनांदुर मतदान केंद्रावर पाहायला मिळाले. संतप्त कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन सह इतर साहित्याची तोडफोड केली होती. याप्ररकरणी आरोप करताना धनंजय मुंडे म्हणाले होते की, शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख आणि त्यांच्या मुलाने मतदारसंघात दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे मतदान केंद्र फोडल्याप्रकरणी देशमुख पिता-पुत्रावर कारवाई करावी, अशी मागणी देखील केली होती. धनंजय मुंडे यांच्या आरोपावर आता राजेसाहेब देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maharshtra Election 2024 : मंत्र्यांच्या मतदारसंघांमध्ये मतदानाचा टक्का वाढला, फायदा की फटका?

माध्यमांशी संवाद साधताना राजेसाहेब देशमुख यांनी धनंजय मुंडेंच्या गुंडांनी ईव्हीएम मशीन फोडल्याचा आरोप केला आहे. तसेच 122 मतदान केंद्रावर फेर मतदान घेण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. राजेसाहेब देशमुख म्हणाले की, बिहारपेक्षा जास्त गुंडगिरी या ठिकाणी सुरू आहे. मतदान केंद्रावरील सीसीटिव्ही कॅमेऱ्याचे कनेक्शन बंद करण्यात आले होते. त्यानंतर परळीतील बँक कॉलनी परिसरात माधव जाधव आणि माझ्या अंगरक्षकाला मारहाण झाली. यानंतर धनंजय मंडे यांच्या लोकांनी मतदान केंद्राची तोडफोड केली आणि माझ्या पुतण्यावर गुन्हे दाखल केले. या ठिकाणी लोकशाही मार्गाने मतदान झाले नाही. त्यामुळे परळी तालुका आणि शहरातील 122 मतदान केंद्रावर फेर मतदान घेण्याची मी मागणी करतो, असे राजेसाहेब देशमुख यांनी निवडणूक आयोगाला सांगितले आहे.

- Advertisement -

राजेसाहेब देशमुख यांना धनंजय मुंडे यांनी केलेल्या आरोपाबाबत प्रश्न विचारले असता, ते म्हणाले की, चोराच्या उलट्या बोंबा आहेत. याठिकाणी त्यांचे साम्राज्य आहे. पोलीस महसूल प्रशासन त्यांच्या सोबत आहे. एवढी अराजकता कधीच झाली नाही. सत्तेचा वापर करून सर्व सामान्य लोकांना उध्वस्त करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे लोक भयभीत झाले आहेत. आमचे नातेवाईक जर मतदान केंद्रावर गेले असतील तर आम्ही मान्य करू, मात्र माझा मुलगा तिकडे गेला नाही. आमच्या सोबत माणूस आला नाही पाहिजे याची सर्व खबरदारी आम्ही घेतली. मात्र बिहारला देखील लाजवेल अशी गुंडगिरी या ठिकाणी सुरू आहे, असे म्हणत राजेसाहेब देशमुख यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला.

हेही वाचा – Delhi Assembly Election : महाराष्ट्रानंतर दिल्लीची बारी, विधानसभा निवडणुकीसाठी आपची पहिली यादी जाहीर


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -