लातूर : महायुतीला सरकारमध्ये बसवणाऱ्या ‘लाडकी बहीण योजने’त छाननी केली जात आहे. कागदपत्रांची पूर्तता नसणे, खोटी कागदपत्रे देणे, अडीच लाखांपेक्षा वार्षिक उत्पन्न अधिक असणाऱ्यांना लाडकी बहीण योजनेतून बाद करण्यात येत आहे. अशातच लातूर जिल्ह्यातील 25 हजारांहून अधिक लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.
लोकसभा निवडणुकीत धक्का बसल्यानंतर विधानसभेपूर्वी महायुती सरकारनं मोठा गाजावाजा करत लाडकी बहीण योजना आणण्यात आली होती. तेव्हा, सरसकट सगळ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात येत होते. परंतु, महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीण योजनेत अर्जांची छाननी करण्यात येत आहे.
हेही वाचा : दावोसमधील ‘त्या’ चिमुरड्याचा किस्सा सांगत फडणवीस म्हणाले, ‘मी पुन्हा येईन…’
लाडक्या बहिणींना दीड हजार रूपये खात्यात कधी पडणार, याची उत्सुकता असते. महायुतीनं सरकारने 7 महिन्यांचे पैसे दीड हजार रूपये प्रमाणे खात्यांवर जमा केले आहेत. परंतु, काही ठिकाणी कागदपत्रांमध्ये छेडछाड, वार्षिक उत्पन्न असल्याचे दिसून आले होते. त्यासह काही अर्जांमध्ये कागदपत्रांची पूर्तताच झाली नसल्याचे समोर येत आहे. त्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील 25 हजार 136 अर्ज बाद करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेने दिली आहे.
5 लाख अर्ज प्राप्त….
लातूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 3 लाख 42 हजार 152 अर्ज दाखल झाले होते. दुसऱ्या टप्प्यात 2 लाख 50 हजार 67 अर्ज आले होते. एकून 5 लाख 92 हजार प्राप्त झाले होते. त्यातच लाडकी बहीण योजनेत छाननी सुरू आहे. या छाननीत 25 हजारांहून अधिक अर्ज रद्द करण्यात आले आहेत. काहींनी कारवाईच्या भीतीने ‘लाडकी बहीण योजना’ नको रे बाबा म्हटले आहे. मात्र, सरकारनं छाननी सुरू करून अनेक अर्ज बाद केले आहेत. त्यामुळे खात्यावर 8 वा हप्ता पडणार की नाही? आपण लाभार्थी राहणार की नाही? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत.
हेही वाचा : देशमुखांच्या आरोपींना झालेली मारहाण दखल घेण्याजोगी,’ नामदेव शास्त्रींच्या विधानावर जरांगे संतापले