घरमहाराष्ट्रMARD Strike : रुग्णांचे हाल, शस्त्रक्रिया रखडल्या; पण मागण्यांसाठी डॉक्टर ठाम

MARD Strike : रुग्णांचे हाल, शस्त्रक्रिया रखडल्या; पण मागण्यांसाठी डॉक्टर ठाम

Subscribe

MARD Strike | मंगळवारी म्हणजे संपाच्या दुसऱ्या दिवशी पालिकेच्या केईएम रुग्णालयात निवासी डॉक्टरांनी निदर्शने केली. राज्य शासन जोपर्यंत आमच्या मागण्यांबाबत ठोस व लिखित आश्वासन देत नाही, तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय 'मार्ड' ने घेतला आहे.

MARD Strike | मुंबई – ‘मार्ड’ संघटनेचे सदस्य असलेल्या निवासी डॉक्टरांनी त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत व त्याबाबत लिखित आश्वासन देईपर्यंत दुसऱ्या दिवशीही आपला संप सुरूच ठेवला आहे. त्यामुळे मुंबईतील सरकारी रुग्णालयांसह मुंबई महापालिकेतील रुग्णालयातील आरोग्य सेवेवर मोठा परिणाम झाला. अनेक रुग्णांचे हाल झाले. हा संप मिटणार तरी कधी, रुग्णांना दिलासा मिळणार कधी, अशी विचारणा रुग्णांकडून करण्यात येत आहे.

सरकारी व पालिका रुग्णालयात कार्यरत सात हजार निवासी डॉक्टरांनी, निवासी वसाहतीमधील समस्या, महागाई भत्ता, कोरोना भत्ता, रिक्त पदे भरणे आदी प्रलंबित समस्या मार्गी लावण्यासाठी व राज्य सरकार आणि महापालिका प्रशासन यांचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारपासून संप पुकारला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – निवासी डॉक्टरांनी संप मागे घ्यावा, 15 दिवसांची मुदत मागत वैद्यकीय मंत्र्यांचे आवाहन

राज्य सरकार व महापालिका या संपावर अद्याप समाधानकारक तोडगा काढू न शकल्याने हा संप चिघळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या सात हजार निवासी डॉक्टरांमध्ये मुंबई महापालिकेच्या सायन, नायर, केईएम व अन्य रुग्णालयातील दोन हजार निवासी डॉक्टरांचा समावेश आहे. त्यामुळे पालिका रुग्णालयात ओपीडी, शस्त्रक्रिया यांवर परिणाम झाला आहे.

- Advertisement -

मंगळवारी म्हणजे संपाच्या दुसऱ्या दिवशी पालिकेच्या केईएम रुग्णालयात निवासी डॉक्टरांनी निदर्शने केली. राज्य शासन जोपर्यंत आमच्या मागण्यांबाबत ठोस व लिखित आश्वासन देत नाही, तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय ‘मार्ड’ ने घेतला आहे.


दरम्यान, मंगळवारी सायंकाळी उशिराने निवासी डॉक्टर व राज्य शासन यांच्याशी संपावर तोडगा काढण्यासाठी व निवासी डॉक्टरांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्यासाठी बैठक होणार असल्याचे समजते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -