लखनौ : हिंदू विवाहमध्ये वर-वधुने सप्तपदी न घेतल्यास विवाह वैध मानला जाणार नाही, असा महत्त्वपूर्ण निरीक्षण अलाहाबाद उच्च न्यायालयाने नोंदविले आहे. न्यायमूर्ती संजयकुमार सिंह यांच्या खंडपीठाने एका कौटुंबीक याचिकेवरील सुनावणीदरम्यान हे निरीक्षण नोंदविले. एका पतिने घटस्फोट न घेता पत्नीने पुनर्विवाह केल्याचा आरोप करणारी याचिका अलाहाबाद न्यायालयात दाखल केली होती. त्या याचिकेवर सुनावणीदरम्यान हे निरीक्षण नोंदवण्यात आले.
याचिकेवर न्यायमूर्ती संजय कुमार सिंह म्हणाले, “जोपर्यंत विवाहमध्ये सर्व विधी योग्य पद्धतीने साजरा होत नाही किंवा पार पडला जात नाही. तोपर्यंत विवाह संपन्न झाला, असे म्हणता येणारन नाही. हिंदू कायद्यानुसार लग्नामध्ये सप्तपदी महत्त्वाच्या आहेत. हिंदू विवाह कायदा, 1955 च्या कालम 7 नुसार, हिंदू विवाह परंपरागत पद्धतीनुसार केला जातो. हिंदू विवाहत सप्तपदीही महत्त्वाची असते. यामध्ये वर आणि वधू पवित्र अग्नीभोवती सात पावले एकत्र चालतात. वर-वधूंनी सातवे पाऊल उचलल्यानंतर विवाह संपन्न होतो, असे न्यायालयाने दाखल केलेल्या पतीच्या याचिकेवर म्हणाले.
हेही वाचा – पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; RBI ने घेतला ‘हा’ निर्णय, वाचा सविस्तर
नेमके काय आहे प्रकरण
याचिकाकर्त्या स्मृती सिंह यांचे 2017 मध्ये सत्मम सिंह यांच्याशी विवाह झाला होता. या विवाहनंतर पतीने हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी पती आणि सासरच्या लोकांविरुद्धात आरोपपत्र दाखल केले. यानंतर 11 जानेवारी 2021 रोजी मिर्झापूर कौटुंबिक न्यायालयाने सत्यम सिंह यांना पोटगी म्हणून पत्नीला दरमहा चार हजार रुपये देण्याचे आदेश दिले. स्मृती सिंग याला दुसरा विवाह करेपर्यंत हे पैसे त्यांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यानंतर स्मृती सिंग यांनी पुनर्विवाह केल्याचा आरोप पती सत्मम सिंह करत वाराणसी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली. 20 सप्टेंबर 2021 रोजी याचिकेवरील सुनावणी करताना कनिष्ठ न्यायालयाने स्मृती सिंह यांना समन्स देखील बजावला होता. 21 एप्रिल 2022 रोजी हजर राहण्यास सांगितले होते. यानंतर स्मृती सिंह यांनी कनिष्ठ न्यायालयाच्या कारवाईविरोधात स्मृती सिंह यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली.