घरताज्या घडामोडीकरोना व्हायरस : परवानगी नसताना लग्न उरकले, वधूपित्यावर गुन्हा दाखल

करोना व्हायरस : परवानगी नसताना लग्न उरकले, वधूपित्यावर गुन्हा दाखल

Subscribe

उरण येथील धुतुम या गावातील नारायण ठाकूर यांनी सरकारचे आदेश धाब्यावर बसवून आपल्या मुलीच्या लग्न समारंभाचे आयोजन केले होते. त्यामुळे उरण पोलिसांनी नारायण ठाकूर यांच्या विरोधात मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक कार्यक्रम आणि समारंभ रद्द करण्याची आदेश राज्य सरकारने केला आहे. मार्च महिन्यापासून लग्न सराई सुरू होते. त्यामुळे अनेक लग्न समारंभ आयोजित केले जातात. परंतु करोना व्हायरसचे संकट टाळण्यासाठी गर्दी कमी करा. मात्र, उरण येथील धुतुम या गावातील नारायण ठाकूर यांनी सरकारचे आदेश धाब्यावर बसवून आपल्या मुलीच्या लग्न समारंभाचे आयोजन केले होते. त्यामुळे उरण पोलिसांनी नारायण ठाकूर यांच्या विरोधात मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

सर्व प्रकारचे उत्सव, सार्वजनिक कार्यक्रम, प्रशिक्षण, मोर्चे, आंदोलन आणि इतर गर्दीच्या कार्यक्रमांना पुढील आदेश येईपर्यंत परवानगी देऊ नये, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. याशिवाय नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरामध्ये पाच अथवा पाचपेक्षा अधिक व्यक्तीचा समावेश असलेल्या जमावास एकत्र येऊन शांतता धोक्यात येईल, असे कृत्य करण्यास मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी आपल्या हद्दीत लोकांची गर्दी जमू शकते, अशा ठिकाणी लोकांना न जमण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisement -

ज्याठिकाणी लग्न समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे, अशा आयोजकांना फौजदारी नोटीस बजावून लग्न समारंभ पार पाडू नये, अशा सक्त सूचना दिल्या गेल्या आहेत. अशा सूचना असतानाही धुतुम गावातील नारायण ठाकूर यांनी १९ मार्च रोजी सायंकाळी उरणच्या जासई गावच्या जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात आपल्या मुलीचा लग्न समारंभ ठेवल्याचे आढळून आले. याची माहिती उरण पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी प्रत्यक्ष लग्न समारंभाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचे निदर्शनास आले.

नारायण ठाकूर यांनी विवाहपूर्वीच उरण पोलिसांनी नोटीस बजावली होती. मात्र, नारायण ठाकूर यांनी पोलिसांच्या नोटीशीला न जुमानता तसेच कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता आपल्या मुलीचा लग्न समारंभ गर्दीत पार पाडत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे उरण पोलीसांनी नारायण ठाकूर यांच्यावर कलम १८८ नुसार आणि मुंबई पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -