मुंबई : महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतिदिनानिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील हुतात्मा स्मारकाला भेट देऊन शहीद हुतात्म्यांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले आहे. यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हे देखील उपस्थित होते.