राज्यात सार्वजनिक ठिकाणी मास्क लावण्याचे आवाहन – राजेश टोपे

Mask Must health minister rajesh tope on corona patients increasing and mask compulsory in maharashtra
Mask Must : मास्क सक्तीवरून नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण, आरोग्य मंत्री म्हणतात...

राज्यात कोरोना (Corona) रुग्ण गेल्या काही दिवसांपासून वाढत असून 1 हजारांच्या पार रुग्णसंख्या पोहचली आहे. याचपार्श्वभूमीवर आज आरोग्य विभागाने राज्यात मास्क वापरण्यासंदर्भात सुचना जारी केल्या आहेत. (Mask Compulsory) यावर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी (Rajesh Tope) यांनी स्पष्टीकरणं दिलं आहे. “राज्याच्या आरोग्य विभागाने must हा शब्द वापरला तरी त्याचा अर्थ सक्ती, mandatory असा होत नाही. मास्क वापरण्याचे हे आवाहन आहे. ते आवाहन समजूनच मीडियाने लोकांनापर्यंत सांगावे. अस टोपे म्हणाले आहेत. (Health Ministry Rajesh Tope)

राजेश टोपे नेमकं काय म्हणाले? 

“राज्यातील काही जिल्ह्यांपूर्ता सर्ज म्हणजे थोडी कोरोना रुग्णसंख्या (Corona patient) वाढतेय. यात मुंबई, पुणे, पालघर, रायगड, ठाणे या जिल्ह्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येला धरून देशाच्या केंद्रीय आरोग्य विभागाने एक पत्र पाठवले होते. या पत्रात संबंधित जिल्ह्यांपूर्ती कोरोना रुग्णसंख्या वाढू नये यासाठी उपाययोजना लागू करण्याच्या सुचना केल्या आहेत. टास्क फोर्सच्या बैठकीत स्पष्टपणे ठरलं की, ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढतेय त्याठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन करावं. म्हणजे अपील करावे. हा अपील करण्याचा मुद्दा आहे. सक्तीचं. 100 टक्के मास्क वापरलाच पाहिजे… अशी सक्ती नाही,” असं स्पष्टीकरण राजेश टोपे यांनी दिले आहे.  (Mask Compulsory)

“10 ते 15 दिवस जी सध्या कोरोनाची सर्ज आलेली आहे त्या दृष्टीकोनातून तरी बंदिस्त ठिकाणी म्हणजे बस, शाळा, रेल्वे, ऑफिससेची ठिकाणं या ठिकाणी मास्क वापरावा. खुल्या ठिकाणी त्याला थोडी शिथिलता असली तरी हरकत नाही. त्या दृष्टीकोनाचा विषय त्या जोडून लसीकरण करा, पहिला आणि दुसरा डोस घेऊन नऊ महिने झाले असली तर बुस्टर डोस (Booster Dose) घ्यायला हरकत नाही. अशाप्रकारच्याही सुचना देण्यात आल्या आहे. सगळ्यात महत्त्वाचं टेस्टिंग वाढवा… एक मोठी तीन पानांची नोटचं आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. जी सर्व महानगरपालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. ज्यातून मार्गदर्शन करण्यात आले आहे की, राज्यातील कोरोना चाचण्य़ा वाढवाव्यात, उर्वरित लसीकरण पूर्ण करावे आणि क्लोज ठिकाणी मास्क वापरण्याच्या दृष्टीने आवाहन करण्यात आले आहे,” असेही राजेश टोपे म्हणाले आहेत.


प्रत्येक पक्षाला आपला मुख्य़मंत्री व्हावा हे वाटणं यात गैर काय? मुंडेंच्या मुख्यमंत्री पदाच्या विधानावर सुप्रिया सुळेंच वक्तव्य