घरमहाराष्ट्रजालन्यातील औद्योगिक वसाहतीतील स्टील कंपनीत भीषण स्फोट; दोघांचा मृत्यू तर चार जखमी

जालन्यातील औद्योगिक वसाहतीतील स्टील कंपनीत भीषण स्फोट; दोघांचा मृत्यू तर चार जखमी

Subscribe

जालन्यातील औद्योगिक वसाहतीमधील स्टील कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. लोखंड वितळवण्याच्या भट्टीमध्ये हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
हा स्फोट इतरा भयंकर होती की, दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच कारखान्याचेही मोठे नुकसान झाले आहे. जखमींना औरंगाबाद शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

समोर आलेल्या माहितीनुसार, जालन्यातील औद्योगिक वसाहतीत गीताई स्टील कंपनीत ही घटना घडली आहे. स्टील वितळवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या भट्टीत हा भीषण स्फोट झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, भट्टीचे अक्षरश: तुकडे झाले आहेत. या दुर्घटनेत एकूण 6 कामगार जखमी झाले आहे. ज्यातील दोघांची प्रकृती गंभीर होती, मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर इतर चार जखमींवर उपचार सुरु आहेत. सर्व जखमींवर औरंगाबाद शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल सुरु आहेत. दरम्यान या घटनेतील जखमी आणि मृत्यांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

- Advertisement -

या घटनेत कंपनीजवळ उभा असलेला ट्रकही जळून खाक झाला आहे. या घटनेनंतर पोलिस कंपनीत दाखल झाले. मात्र स्फोट कसा झाला याची माहिती अदयाप पोलिसांकडून मिळालेली नाही. त्याबाबतचा तपास सुरु असल्याची माहिती देण्यात आली.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -