घरमहाराष्ट्रवसईतील कॉस पॉवर कंपनीत बॉयलरचा भीषण स्फोट; 3 कामगारांचा मृत्यू, 7 जखमी

वसईतील कॉस पॉवर कंपनीत बॉयलरचा भीषण स्फोट; 3 कामगारांचा मृत्यू, 7 जखमी

Subscribe

वसईतील कॉस पॉवर कंपनीत बॉयलरचा भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. यावेळी स्फोटामुळे लागलेल्या आगीत 3 कामगारांचा मृत्यू झाला आहे तर 7 कामगार जखमी झाले आहेत. सर्व जखमींना स्थानिक रुग्णालयांत तातडीने उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गजवळील वसईच्या वाकीपाडा येथील कॉस पॉवर कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. आज दुपारी 2.30 च्या सुमारास ही घटना घडली.

आगीची माहिती मिळताच वसई पालिकेचे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहे. दरम्यान स्थानिक पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली आहे. कॉस पॉवर कंपनीत विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे तयार केली जात होती. मात्र आगीत कंपनीतील अनेक उपकरणे जळून खाक झाली आहे.

- Advertisement -

बुधवारी अचानक झालेल्या या स्फोटामुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान या स्फोटात सात कर्मचारी जखमी झाले असून जखमींची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होतं आहे. वैष्णवी, भावेश, जयदीप राव, सागर, हर्षला व अन्य चार जण जखमींना बाहेर काढून उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान अजय व अन्य दोन जणांचा या स्फोटात जागीच मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह बाहेर काढत पोलिसांनी ते शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले आहेत. तसेच याप्रकरणी वालीव पोलिलांकडून अधिकचा तपास सुरु आहे.


बोईसरमध्ये गोळीबारात तरुणीचा जागीच मृत्यू; पळून जाताना माथेफिरू तरुण जखमी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -