तारापूर MIDC प्लांटला भीषण आग, कंपनीत आग पसरल्यानंतर सलग आठ मोठे स्फोट

Massive fire at Tarapur MIDC plant,

पालघर येथील तारापूर एमआयडीसी प्लांटमध्ये रात्री उशीरा भीषण आग लागली. कंपनीत आगा लागल्यापासून सलग आठ मोठे स्फोट झाले. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी जवान शर्तीचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून जीवित व वित्तहानीबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

आग आटोक्यात आणण्याचे अग्निशमन दलासमोर मोठे आव्हान  –

बोईसर येथील तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्रीमियर इंटरमीडियरी केमिकल कंपनीला भीषण आग लागली. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आगीचे स्वरूप गंभीर असून ती आटोक्यात आणण्याचे सर्वात मोठे आव्हान अग्निशमन दलासमोर आहे. स्थानिक पालिका प्रशासन, पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

धूरामुळे परिसरातील स्थानिक रहिवाशांना श्वास घेणे कठीण –

केमिकल कंपनीला आग लागल्याने मोठ्या प्रमाणात धूर निघू लागला आहे. त्यामुळे परिसरातील स्थानिक रहिवाशांना श्वास घेणे कठीण होत आहे. रात्रीच्या अंधारामुळे आग विझवणे अग्निशमन दलाला कठीण जात होते. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी आणखी काही तास लागण्याची शक्यता आहे. या आगीमुळे कंपनीत अनेक स्फोट झाले आहेत.