नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीतील एका कंपनीला भीषण आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या एमआयडीसीतील वेस्ट क्लाय पॉलिकॅब कंपनीला आग लागली आहे. ही आग मोठी असून आगीच्या धुरांचे लोळ सर्वत्र पसरत आहेत. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली आहे.
नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीतील वेस्ट क्लाय पॉलिकॅब कंपनीला भीषण आग लागली. शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही आग लागली. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ५ गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्तीचे प्रयत्न करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वेस्ट क्लाय पॉलिकॅब कंपनी ही केमिकल कंपनी आहे. तसंच, आग लागल्यामुळे कंपनीच्या वरच्या भागात चार ते पाच कामगार अडकले आहेत. या कर्मचाऱ्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्तीचे प्रयत्न करत आहेत.
हेही वाचा – Ed चा मोर्चा आता अवैध खाणींकडे; 5 राज्यातील 18 ठिकाणावर छापेमारी