नागपूरमधील महाकाली झोपडपट्टीला भीषण आग

नागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाकालीनगर झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. सिलेंडरमधून झालेल्या गळतीमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

नागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाकालीनगर झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. सिलेंडरमधून झालेल्या गळतीमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत.

सोमवारी सकाळच्या सुमारास महाकालीनगर झोपडपट्टीला आग लागली. ही आग लागल्यावर स्थानिक, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 3 ते 4 गाड्या दाखल झाल्या आहेत. या आगीत जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप अस्पष्ट आहे. परंतु मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.

दरम्यान, ही आग सिलेंडर गळतीमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असला. तरी येथील प्रत्यक्षदर्शींनी अनेक सिलेंडरचा ब्लास्ट झाल्याचे म्हटलं. या आगीत महाकाली झोपडपट्टीमधील अनेक घर जळून खाक झालेली आहेत.


हेही वाचा – अजित पवारांनी सांताक्रूझ पोलीस कोठडीतील CCTV फुटेज जारी करावं, नवनीत राणांचे आव्हान