घरताज्या घडामोडीमणिपूरमध्ये भूस्खलन; लष्कराचा कॅम्प ढिगाऱ्याखाली, दोन जवानांचा मृत्यू

मणिपूरमध्ये भूस्खलन; लष्कराचा कॅम्प ढिगाऱ्याखाली, दोन जवानांचा मृत्यू

Subscribe

मुंबईसह देशभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या मुसळधार पावसामुळे फटका लष्करी जवानांनाही बसला आहे. मणिपूरमध्ये (Manipur) भूस्खलन झाले असून, यामध्ये लष्कराचा एक कॅम्प (Army Camp) मातीच्या ढिगाऱ्याखाली दबला गेल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईसह देशभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या मुसळधार पावसामुळे फटका लष्करी जवानांनाही बसला आहे. मणिपूरमध्ये (Manipur) भूस्खलन झाले असून, यामध्ये लष्कराचा एक कॅम्प (Army Camp) मातीच्या ढिगाऱ्याखाली दबला गेल्याची माहिती समोर येत आहे. भूस्खलनामुळे आतापर्यंत दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. तसेच, घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफच्या जवानांनी घटनास्थळी मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. (Massive Landslide In Manipur Two Dead Many Army Soldier Are Trapped)

बुधवारी रात्री मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. पावसाचा जोर अधिक असल्याने अचानक भूस्खलन (Landslide) झाले. तुपुल रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली आहे. आतापर्यंत १९ जणांना वाचवण्यात यश आले दरम्यान, मातीच्या ढिगाऱ्याखाली अद्यापही अनेकजण दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. गंभीर जखमींना नोनी आर्मी मेडिकल युनिटमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, जिरीबामला इम्फाळशी जोडण्यासाठी एक रेल्वे मार्ग तयार करण्यात येत होता. ज्याच्या संरक्षणासाठी १०७ टेरिटोरिल तुकडीचे जवान तैनात करण्यात आले होते. ज्यात अनेकजण मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. घटनेची माहिती मिळताच याठिकाणी लष्कर, आसाम रायफल्स, मणिपूर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.


हेही वाचा – मुंबईत गेल्यावर पुढची रणनीती सांगेन, एकनाथ शिंदेंची गुगली

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -