Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र भाचीच्या विनयभंगानंतर मामाची आत्महत्या

भाचीच्या विनयभंगानंतर मामाची आत्महत्या

Subscribe

३९ वर्षीय मामानं भाचीचा विनयभंग केल्याचा प्रकार चाकणमध्ये घडला आह. दरम्यान, मामानं आत्महत्या केली असून कारण मात्र अस्पष्ट आहे.

स्त्रियांच्या, मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ओळखीतील, नात्यातील लोकांकडून देखील आता मुलींवर आणि महिलांवर अत्याचाराच्या, बलात्काराच्या आणि विनयभंगाच्या घटना वाढताना दिसत आहेत. दरम्यान अशीच एक घटना चाकणमध्ये उघडकीला आली आहे. मामा – भाचीचं नातं पवित्र. पण, याच नात्याला काळीमा फासण्याचा प्रयत्न मामानं केला आहे. उद्योगनगरी समजल्या जाणाऱ्या चाकणमध्ये मामानं १३  वर्षीय भाचीचा  विनयभंग केला. त्यानंतर एकच खळबळ उडाली. पीडित मुलीच्या आईचा देखील या प्रकारवर विश्वास बसेना. काय करावं हेच सुचेना. अखेर पीडित मुलीच्या घरच्यांनी थेट पोलीस ठाणे गाठत मामाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी देखील पीडितेची तक्रार तात्काळ दाखल करून घेतली आणि ३९ वर्षीय मामाविरोधात गुन्हा दाखल केला. भाची अभ्यास करत असताना मामानं भाचीचा विनयभंग केला. पण, त्यानंतर या प्रकारला नाट्यमय वळण लागलं. आज ( सोमवारी) सकाळी मामानं झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी त्यानं लिहिलेली चिठ्ठी देखील पोलिसांच्या हाती लागली असूनआत्महत्येला कुणालाही जबाबदार धरू नये असं म्हटलं आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -