घरताज्या घडामोडीआज माथाडी कामगारांचा राज्यव्यापी संप

आज माथाडी कामगारांचा राज्यव्यापी संप

Subscribe

आज माथाडी कामगार प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी राज्यव्यापी संप करणार आहेत. यामुळे एपीएमसी मधील सर्व व्यवहार बंद राहणार आहे.

प्रलंबित मागण्या पूर्ण होण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सापोर्ट आणि जनरल कामगार युनियनने राज्यव्यापी बंदचे आयोजन केलं आहे. मुंबई बाजार समितीसह विविध जिल्ह्यांमधील संघटनेचे एक लाखाहून अधिक माथाडी कामगार या राज्यव्यापी संपात सहभागी होणार आहेत. या संपामुळे एपीएमसी मधील दैनदिन व्यवहारांवर परिणाम होणार आहे.

कामगारांचे पगार, माथाडी बोर्डाची पुनर्रचना, पुणे आणि नाशिकमधील कामगारांचे प्रश्न, बोर्डामधील कर्मचारी भरती, वडाळामधील घरे आणि इतर प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हा एक दिवसाचा संप करण्यात येणार आहे. अनेक वर्षांपासून माथाडी कामगारांचे १८ प्रमुख प्रश्न प्रलंबित आहेत. एपीएमसी मार्केटसह, रेल्वे धक्के, पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर आणि इतर ठिकाणीही हा बंद करण्यात येणार असल्याचं सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – आमदार अनिल भोसले यांना आज कोर्टात हजर करणार, ७१ कोटींच्या बॅंक घोटाळा प्रकरणी अटक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -