घरमहाराष्ट्रपर्यटकांची पहिली पसंती माथेरानच्या राणीलाच, शटलच्या फेऱ्यातही झाली वाढ

पर्यटकांची पहिली पसंती माथेरानच्या राणीलाच, शटलच्या फेऱ्यातही झाली वाढ

Subscribe

माथेरान राणीच्या सुरूवातीला दिवसाला 4 फेऱ्यांच्या स्वरूपात सुरु झाली होती. हीच सेवा आता दिवसाला 14 शटल फेऱ्यांच्या स्वरुपात अमन लॉज ते माथेरान अशा दोन ते तीन किमीच्या टप्प्यात सुरु आहे.

कोरोना अनलॉकनंतर जवळचे पर्यटनस्थळ म्हणून पर्यटकांनी माथेरानला पसंती दिली आहे. माथेरानच्या राणीला म्हणजेच टॉय ट्रेनला कोरोनानंतर अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. अनलॉकनंतरच्या 101 दिवसांमध्येच 90 हजार 753  पर्यटकांनी या टॉय ट्रेनच्या माध्यमातून सफर केली आहे. निसर्गरम्य वातावरण आणि मनमोहक दृश्ये, हिरव्यागार वनराईतून थंडगार प्रवासाचा मनमुराद आनंद पर्यटक घेत टॉय ट्रेनने पर्यटकांना चांगलाच आनंद दिला आहे. या दरम्यानच्या काळात प्रवासी वाहतूकीसोबतच दस्तूरीनाका (अमन लॉज) ते माथेरान दरम्यान माथेरानच्या ‘राणी’ने 11,879 पार्सलची मालवाहतूकही केली आहे.

लॉकडाऊन काळात पर्यटकांना माथेरानमध्ये बंदी झाल्यानंतर काही दिवसांत माथेरान-अमन लॉज शटल सेवाही बंद करण्यात आली होती. माथेरान राणीच्या 4 नोव्हेंबर पासून अमन लॉज ते माथेरान अशा शटल फेऱ्या सुरु करण्यात आल्या. तिला पहिल्याच दिवसापासून उत्तम प्रतिसाद मिळाला. दस्तुरीपासून (अमर लॉज) माथेरान बाजारपेठ हे दोन किलोमीटरचे अंतर चालताना पर्यटकांची दमछाक होत होती.

- Advertisement -

माथेरान राणीच्या सुरूवातीला दिवसाला 4 फेऱ्यांच्या स्वरूपात सुरु झालेली सेवा आता दिवसाला 14 शटल फेऱ्यांच्या स्वरुपात अमन लॉज ते माथेरान अशा दोन ते तीन किमीच्या टप्प्यात सुरु आहे. 12 फेब्रवारी रोजी माथेरानच्या राणीची 1070 तिकिटे दिवसभरात बुक झाली असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.

पिटलाईन माथेरानमध्ये करण्याचा निर्णय

माथेरानच्या राणीचा नेरळ ते माथेरान असा 21 किमीचा नॅरोगेज मार्ग दोन वर्षापूर्वी अतिवृष्टीने एकूण 22 ठिकाणी खराब झाला होता. मिनी ट्रेनच्या देखभालीची व्यवस्था नेरळमध्ये खालच्या बाजूला आहे. लोको शेड नेरळमध्ये असल्याने इंजिन व बोगीची कामे तेथील पिटलाइनमध्येच करावी लागत होती. त्यामुळे मिनी ट्रेन ही नेरळमध्ये आठवड्यातून एकदा पाठवली जायची. एखादी फेरी उशिराने अमन लॉज-माथेरान धावत होती. त्यामुळे रेल्वेने पिटलाईन माथेरानमध्ये करण्याचा निर्णय घेतला. तब्बल दीड वर्षानंतर पिटलाईनची उभारणी झाल्याने इंजिन व बोगीची दुरुस्ती माथेरानमध्येच होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा- बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात, १४ जणांचा मृत्यू 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -