घरताज्या घडामोडीमटका किंगची गोळ्या घालून हत्या; आरोपीचा शोध सुरु

मटका किंगची गोळ्या घालून हत्या; आरोपीचा शोध सुरु

Subscribe

कल्याण येथे एका मटका किंगची हत्या करण्यात आली आहे.

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात निलम गल्लीत मटका किंग जिग्नेश ठक्कर उर्फ मुन्ना यांच्यावर गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. त्यांच्या ऑफिस समोर अज्ञात इसमांनी गोळीबार केल्याचे समोर आले असून सध्या पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. या घटनेने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार; जिग्नेश ठक्कर याचे कल्याण, उल्हासनगर आणि ठाणे परिसरात अनेक ठिकाणी मटका आणि रम्मी क्लब असून तो क्रिकेट मॅचवर देखील सट्टा बाजार करत असल्याचे समजते. त्याला मटका किंग ही संबोधित जात होते. शुक्रवारी जिग्नेश हा कल्याण स्टेशन परिसरात असलेल्या आपल्या कार्यालय बाहेर येऊन घरी जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी जिग्नेशवर हल्लेखोरांनी पाच गोळ्या झाडल्या होत्या. जीग्नेशला चार गोळ्या लागल्या असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले पोलीस घटनास्थळी धाव घेत जखमी जिग्नेशला फोर्टीज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरानी जिग्नेशला मृत घोषित केले. अज्ञात हल्लेखोराविरोधात रात्री उशिरा महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक निर्माण केले असून शोध मोहीम सुरू आहे. या घटनेने कल्याणमध्ये एकच खळबळ माजली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -