घरCORONA UPDATEआयसोलेशन वार्डसाठी 'मदरसा' देणार; मौलाना हारिस यांची घोषणा

आयसोलेशन वार्डसाठी ‘मदरसा’ देणार; मौलाना हारिस यांची घोषणा

Subscribe

सोलापूरमधील चंद्रकला नगरमध्ये असलेल्या अल फुरकान मदरस्याची जागा दोन महिन्यांकरीता आयसोलेशन वार्डसाठी देणार आहेत.

दिल्लीतील मरकज प्रकरण ताजं असताना सोलापूरातील मुस्लिम बांधवांनी कौतुकास्पद पाऊल उचललं आहे. मुस्लिम बांधव सोलापूरमधील नई जिंदगी येथील चंद्रकला नगरमध्ये असलेल्या अल फुरकान मदरस्याची जागा दोन महिन्यांकरीता आयसोलेशन वार्डसाठी देणार आहेत. याबाबतची घोषणा अल फुरकान एज्युकेशनल ट्रस्टचे अध्यक्ष मौलाना हारिस दस्तगीर यांनी केली आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी आम्ही देशासोबत आहोत. आमच्या संस्थेच्या माध्यमातून एक अरबी मदरसा चालवला जातो. मात्र, लॉकडाऊनमुळे हा मदरसा बंद आहे. म्हणून हा मदरसा आम्ही आयसोलेशन वार्डसाठी उपलब्ध करून देणार आहोत. त्याबाबतचा पत्रव्यवहार मुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याची माहिती मौलाना दस्तगीर यांनी दिली. मुहम्मद पैगंबरांच्या शिकवणीनुसार हे काम मोठं आणि पुण्याचं आहे, असं मौलाना यांनी म्हटलं.


हेही वाचा – आता मी क्वारंटाईनमध्ये आहे, प्रश्नांची उत्तरं नंतर देईन – मौलाना साद

तबलिगी जमातच्या लोकांना हवी अंडा करी आणि बिर्याणी

दिल्लीतील तबलीग जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवलं आहे. यामध्ये इंडोनेशियाच्या ८ नागरिकांसह १३ जणांनी रुग्णालयात गोंधळ घातला. तर काहीजण अंडा करी आणि बिर्याणीची मागणी करत आहेत. या १३ जणांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तणूक केली.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -