Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaulana Sajjad Nomani : महायुतीच्या विजयानंतर मौलाना नोमानींनी मागितली जाहीर माफी; म्हणाले

Maulana Sajjad Nomani : महायुतीच्या विजयानंतर मौलाना नोमानींनी मागितली जाहीर माफी; म्हणाले

Subscribe

महाराष्ट्रात भाजपाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर मौलाना सज्जाद नोमानी यांनी 'व्होट जिहाद'बाबत केलेल्या वक्तव्याबद्दल बिनशर्त माफी मागितली आहे.

मुंबई : नुकत्याच राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या आहे. या निवडणुकांमध्ये महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे. महाराष्ट्रात भाजपाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर मौलाना सज्जाद नोमानी यांनी ‘व्होट जिहाद’बाबत केलेल्या वक्तव्याबद्दल बिनशर्त माफी मागितली आहे. कोणत्याही समाजाला दुखावण्याचा आपला हेतू नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. (Maulana Sajjad Nomani unconditional apology on vote jihad after-maharashtra election result.)

हेही वाचा : Devendra Fadnavis : मुख्यमंत्रीपदी फडणवीस, मराठी की ओबीसी चेहरा? अमित शहा आज मुंबईत!

- Advertisement -

राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवल्याचे दिसून आले आहे. महायुतीने 235 जागा मिळवल्य़ाने आता सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. एकट्या भाजपाने एकूण 132 जागा जिंकल्या आहेत. तसेच यंदाच्या निवडणुकीमध्ये लाडकी बहिण योजना, व्होट जिहाद आणि मराठा आरक्षण असे अनेक मुद्दे गाजले आहेत. त्यातील एक जास्तीत जास्त गाजलेला व्होट जिहादचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला होता. मौलाना सज्जाद नोमानी यांनी भाजपाला पाठिंबा देणाऱ्या मुस्लिमांची खिल्ली उडवली आणि स्वत:चे नाव धनश्याम ठेवण्याचा सल्ला दिला होता. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नोमानी यांनी बिनशर्त जाहीर माफी मागितली आहे. त्यांचा हेतू कोणत्याही विशिष्ट समुदायाला लक्ष्य करण्याचा किंवा फतवा काढण्याचा नव्हता, असे त्यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या पत्रात नमूद केले आहे.

हेही वाचा : Maharashtra Election Results 2024 : स्पष्ट आणि निर्विवाद बहुमत आवश्यक, पण…

- Advertisement -

मौलाना सज्जाद नोमानी यांनी निवडणुकीदरम्यान वादग्रस्त फतवा काढला होता. राज्यातील भाजपाला पाठिंबा देणाऱ्या मुस्लिमांना इस्लामच्या कक्षेबाहेर फेकून दिले पाहिजे. तसेच त्यादरम्यान त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये त्यांनी भाजपाला पाठिंबा देणाऱ्या मुस्लिमांची खिल्ली उडवली आहे. तसेच ज्या मुस्लमांनानी भाजपाला पाठिंबा दिला त्यांनी आपले नाव बदलून धनश्याम करा, असा टोला लगावला होता. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर नोमानी यांचे एक पत्र समोर आले आहे. ज्यामध्ये त्यांनी त्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागितली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत लोकांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवलेल्या लोकांसाठी ते वक्तव्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच  आपले शब्द त्या व्यक्तींसाठी आहेत, व्यापक मुस्लिम समाजासाठी नाहीत, असेही ते म्हणाले आहेत. तसेच माझे हे विधान महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीचे आहे. माझा कोणत्याही समाजावर टिप्पणी करण्याचा हेतू नव्हता, तसेच आम्ही फतवाही काढला नव्हता, असे म्हणत नोमानी यांनी आपल्या पत्रात बिनशर्त माफी मागितली आहे.


Edited By Komal Pawar Govalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -