CoronaVirus: देशात महाराष्ट्रामध्ये सर्वाधित कोरोनाच्या चाचण्या; आरोग्य मंत्र्यांची माहिती

राज्यात सध्या १ हजार ६५२ लोकांना कोरोनाची लागण झाली असून मुंबई, पुणे, ठाणे परिसरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले असल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली.

There is no case of Monkey Pox in Maharashtra, said Rajesh Tope
मंकीपॉक्सचे एकही प्रकरण महाराष्ट्रात नाही; कुठलेही भय मनात बाळगू नका - राजेश टोपे

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज सायंकाळी कोरोनाचा राज्यातील तपशील जनतेला दिला. त्यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली की, राज्यात आतापर्यंत ३३ हजार रुग्णांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. देशात आतापर्यंत महाराष्ट्रात सर्वाधित कोरोनासंबंधीच्या चाचण्या झाल्या आहेत. राज्यात सध्या १ हजार ६५२ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबई, पुणे, ठाणे परिसरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले असल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी यावेळी दिली. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ५ टक्के लोकं गंभीर अवस्थेत आहेत. तर २५ टक्के रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. मुंबईत कोरोनाचे ६१ टक्के रुग्ण असून पुण्यात २० टक्के रुग्ण आढळले आहेत. तर ठाणे, पालघर, नवी मुंबईत कोरोनाचे १० टक्के रुग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान, हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा वापर नियमानुसार केला जाणार आहे, असे आरोग्य मंत्र्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रात तीन प्रकारचे हॉस्पिटल असणार असून सामान्य, माईल्ड आणि क्रिटीकल रुग्णांसाठी हॉस्पिटल असतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. लक्षणे नसलेल्यांना सामान्य हॉस्पिटल, तर कमी लक्षणे असलेल्यांना माईल्ड हेल्थ सेंटरमध्ये ठेवण्यात येईल. तर गंभीर स्वरुपाच्या रुग्णांना क्रिटिकल सेंटरमध्ये ठेवण्यात येईल. यासंबंधी खासगी हॉस्पिटलनेही सहकार्याची तयारी दाखवली आहे. कोरोनाशी लढण्यासाठी पूल टेस्टिंगचा निर्णय घेण्यात आला आहे. वेळ आणि टेस्टिंग किटची बचत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे आरोग्य मंत्री म्हणाले. यामध्ये खबरदारी म्हणून घरातील ४ जणांची टेस्ट केली जाईल. राज्यातही देशाप्रमाणे ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोन केले जातील. ग्रीन झोनमध्ये उद्योगधंदे सुरू ठेवण्याबाबतची चर्चा करण्यात येईल, असे संकेत टोपे यांनी दिले. यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यास मदत होईल. तसेच आरोग्य मंत्र्यांनी सरकारने सुरू केलेल्या आरोग्य सेतू अॅप सर्वांनी डाऊनलोड करण्याचेही आवाहन यावेळी केले. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी आरोग्य सेतू अॅप उपयोगी ठरेल, असे ते म्हणाले.

दरम्यान, थोड्यावेळा पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा केली आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाग्रस्त असल्याने राज्यासाठी ही चिंतेची बाब आहे. त्यामुळेच हा लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या राज्यात १ हजार ६६६ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून ११० लोकांना या आजारामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर देशात कोरोनाने ७ हजार रुग्णांचा आकडा पार केला आहे.

हेही वाचा –

हायड्रॉक्सीक्लोरोक्विन म्हणजे काय आणि जगभरात मोठ्या प्रमाणात मागणी का आहे?