घरताज्या घडामोडी'त्या पार्टीतील मंत्र्यांचे नाव सांगा, नाहीतर माफी मागा', महापौरांचे आशिष शेलारांना आव्हान

‘त्या पार्टीतील मंत्र्यांचे नाव सांगा, नाहीतर माफी मागा’, महापौरांचे आशिष शेलारांना आव्हान

Subscribe

बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरच्या पार्टीतील मंत्र्यांचे नाव सांगा, नाहीतर माफी मागा असे आव्हान भाजप नेते आशिष शेलार यांना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलं आहे. जनतेची फसवणूक करण्याची सुपारीच शेलारांनी घेतली आहे. माध्यमांसमोर येऊन जनतेला गुमनाम करत आहेत. शिवसेनेवर नुसते बेछूट आरोप करत जनतेला गुमनाम करण्याचे काम भाजपचे नेते आणि आशिष शेलार करत आहेत. शेलार आमदार आहेत तरी त्यांचा जीव मात्र महानगरपालिकेत घुटमळत असल्याची खोचक टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.

करण जोहरच्या पार्टीत सहभागी झालेल्या अभिनेत्रींना कोरोनाची लागण झाली आहे. यावरुन राजकारण चांगलच तापलं आहे. कारण जोहरच्या पार्टीत महाविकास आघाडीतील दोन मंत्री उपस्थित होते असा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. शेलारांनी केलेल्या आरोपांवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाष्य केलं असून शेलारांना त्या मंत्र्यांचे नाव जाहीर करण्याचे थेट आव्हान दिलं आहे. पेडणेकरांनी म्हटलं आहे की, ज्या करण जोहरच्या पार्टीचा उल्लेख भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. त्यांनी त्या मंत्र्यांची नावे जाहीर करावीत. तुम्हाला खोटं बोला पण रेटून बोला हेच शिकवलं का? असा सवालही किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.

- Advertisement -

दरम्यान किशोरी पेडणेकर यांनी आशिष शेलारांवर हल्लाबोल करताना पुढे म्हटलं आहे की, पार्टीत मंत्री उपस्थित होते ते आता सिद्ध करुन दाखवा. शेलारांनी बेछूट आरोप करायची आणि जनतेला गुमनाम करण्याची सुपारी घेतली आहे. आमदार झालात तरी तुमचा जीव महानगरपालिकेत घुटमळत आहे. त्या जीवाला मोकळं करा असा घणाघात पेडणेकर यांनी केला आहे. लोकशाहीने अधिकार दिला म्हणून कसेही बोलू नका तर तुमच्याकडे काय पुरावा आहे ते जनतेला दाखवा त्यामुळे आम्हालासुद्धा कळेल. ते मंत्री कोण होते याचा खुलासा करावा अन्यथा जनतेची माफी मागा अशी मागणी किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.

भाजपचे नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात

भाजपचे नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. भाजपचा त्यांच्याच नगरसेवकांवर विश्वास नाही. आजही शेलारांच्या बैठकीला नगरसेवक नसतात. विश्वास नसल्यामुळे नगरसेवक नाराज आहेत. त्यातील काही नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. आशिष शेलार भाजपचे नगरसेवक झाले तरी त्यांचा जीव महानगरपालिकेत घुटमळत आहे. काम करुन देत नसल्यामुळे नगरसेवकही कंटाळले त्यामुळेच ते संपर्कात आहेत असे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : ‘माझ्या घरी येणाऱ्या पाहुण्यांना चहासह बिस्कीट देणार’, नवाब मलिकांच्या सूचक ट्विटमुळे चर्चांना उधाण


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -