घरताज्या घडामोडीपरराज्यातून मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाचं लसीकरण असणं अनिवार्य - महापौर किशोरी पेडणेकर

परराज्यातून मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाचं लसीकरण असणं अनिवार्य – महापौर किशोरी पेडणेकर

Subscribe

आंतरराष्ट्रीय आणि परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचा १५ दिवसांचा रिपोर्ट तपासला जाणार आहे. केंद्र सरकार आणि राज्यात असेलेल्या नियमांचं मुंबई महापालिका पालन करणार आहे. कर्नाटकात ओमिक्रॉनचे २ रूग्ण सापड्ल्यामुळे मुंबई महापालिका आता सतर्क झाली आहे. २८ नोव्हेंबरला परदेशातून आलेले प्रवाशी ३ पॉझिटिव्ह आले आहेत. तर ७३ निगेटिव्ह आले आहेत. एकाच वेळी ३७६ जणांचे रिपोर्ट बनवणे खूप कठीण आहे. त्यामुळे हे रिपोर्ट आम्ही पुण्याला पाठविले आहेत. कारण हे रिपोर्ट लवकरात लवकर येऊ शकतात. उद्या किंवा परवा पर्यंत त्यांचा रिपोर्ट येणं अपेक्षित आहे. असं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या म्हणाल्या की, परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसागणिक २ हजारांच्या आसपास असते. परराज्यातून मुंबई विमानतळावर येणाऱ्यांचं आरटीपीआर किंवा लसीकरण रिपोर्ट निगेटिव्ह येणं गरजेचं आहे. परंतु मुंबईत एकही ओमिक्रॉनचा रूग्ण सापडलेला नाहीये. परंतु काळजी घेणं गरजेचं आहे. कारण कर्नाटकामध्ये २ रूग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांची सीमा या एकदम जवळ आहेत. त्यामुळे सर्वांनी सतर्क राहणं महत्त्वाचं आहे.असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

- Advertisement -

विमानतळावरून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांना हे नियम लागू असणार 

दोन प्रकारचे रिपोर्ट हे कस्तुरबा रूग्णालयात पाठवले आहेत. कारण ३७६ सँम्पल येईपर्यंत वाटणं बघणं. ज्या रिपोर्टमध्ये शंका आहे. त्यांचे रिपोर्ट आधी पाठवण्यात आले आहेत. त्यांचे रिपोर्ट लवकर येणं गरजेचं आहे. ओमिक्रॉन हा विषाणू परदेशातून आला आहे. त्यामुळे सर्व महापालिकेने काळजी घेणं गरजेचं आहे. परंतु एकदा प्रवासी आढळला असता त्याची माहिती घेणं वॉर्डने गरजेचं आहे. विमानतळावरून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांना हे नियम लागू असणार आहे. कारण मुंबई महापालिका यावर सकारात्मक दृष्टीने विचार करत आहे.

लोक बाधित होऊ नये यासाठी आमचा प्रयत्न आहे. दुसऱ्या लाटेला रोख लावला त्यानंतर तिसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवलं. केंद्र , राज्य व महापालिकेने यावर काळजी घेणं गरजेचं आहे. माझी कुटुंब माझे जबाबदारी या दायरेत राहून आपण काम केलं पाहिजे. असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -