मिठी नदी सफाई कामाचा महापौरांनी घेतला आढावा, गाळ काढणाऱ्या सिल्ट पुशींग पन्टुन मशीनची पाहणी

Mayor kishori pednekar reviews Mithi river cleaning work, inspects silt pushing pontoon machine
मिठी नदी सफाई कामाचा महापौरांनी घेतला आढावा, गाळ काढणाऱ्या सिल्ट पुशींग पन्टुन मशीनची पाहणी

वांद्रे-कुर्ला संकुलातील एमटीएनएल कार्यालयालगतच्या मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सिल्ट पुशींग पन्टुन मशीनची मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पाहणी करून मिठी नदी सफाई कामाचा आढावा घेतला आहे. मुंबईतील मिठी नदीच्या गाळ काढण्याचे काम वेगाने सुरु आहे. हा गाळ काढण्यासाठी महानगरपालिकेकडून अत्याधुनिक यंत्रांचा वापर करण्यात येत आहे. या कामाचा महापौरांनी आढावा घेतला आहे.

महापौर किशोरी पेडणेकर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या की, पूर्व उपनगरामधील मिठी नदी आणि पातमुखे ही येणारी माती, घाण, कचरा आणि गाळाने भरतात. पर्जन्य जलवाहिन्या नाल्यातून सांडपाणी आणि काही प्रमाणात गाळ वाहून येऊन तो मिठी नदीच्या पातमुखामध्ये, तसेच मिठी नदीत जमा होतो. त्यामुळे पाण्याचा निचरा व्यवस्थित न होता गाळ साचून राहतो. पावसाळा सुरु होण्यापूर्वी आणि त्यानंतर मिठी नदीचा प्रवाह सुरळीत ठेवण्याकरीता मिठी नदी तसेच संबधीत पातमुखामधील गाळ काढणे आवश्यक आहे.

मिठी नदीचा विमानतळ पूल ते माहिम कॉजवे दरम्यानचा तळ समतल असून सदर भाग भरती प्रवण क्षेत्रात असल्यामुळे मिठी नदीत सदर ठिकाणी जलद गतीने गाळ साठला जात असून सदर गाळ शास्त्रीय पध्दतीने किमान आवश्यक परिमाणानूसार काढल्यास नदीच्या तिरांवर, विशेषत लाल बहादुर शास्त्री मार्गावर पूरस्थिती निर्माण होते. त्यामुळे मध्य रेल्वे सुध्दा विस्कळीत होते.

मिठी नदीचा गाळ व कचरा शास्त्रीय पध्दतीने व पूरस्थिती न उदभवण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष कार्यस्थळावर असलेल्या किमान आवश्यक परिमाणानूसार आधुनिक पध्दतीच्या यंत्रसामुग्रीने काढण्यासाठी बृहन्मुंबई महाननगरपालिकेतर्फे मिठी नदीच्या गाळ काढण्याचे काम अत्याधुनिक यंत्रसामुग्री जसे सिल्ट पुशींग पन्टुन मशीन, मल्टिपर्पज अम्फिबियस पन्टुन मशीन यासोबत पोक्लेन मशीन आदीमार्फत करण्यात येत आहे.

मिठी नदीच्या भरती प्रवण क्षेत्रात विशेषतः एअरपोर्ट टॅक्सीवे पूल ते बीकेसी कनेक्टर पूल दरम्यानच्या भागात नदीची रुंदी ६० मि. ते २०० मिटर ईतकी असून नदीच्या बहुतांश तीरावर अतिक्रमणे आहेत. तसेच नदीतील साचलेला गाळ एकसमान पद्धतीने काढून नदीचा तळ समतल करणे आवश्यक आहे. मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामांमध्ये अत्याधुनिक यंत्रसामुग्री जसे सिल्ट पुशींग पन्टुन मशीन, मल्टिपर्पज अम्फिबियस पन्टुन मशीन यासोबत पोक्लेन मशीन आदीमार्फत नदीचा गाळ व ईतर सर्व प्रवाहाला अडथळा निर्माण करणा-या वस्तू जसे जलपर्णी, दगडगोटे, तरंगता कचरा काढण्याचे काम करण्यात येत आहे.


हेही वाचा : मुंबई महापालिकेच्या सदस्य संख्यावाढीला राज्यपालांची मंजूरी; नगरसेवकांची संख्या आता २३६ होणार