Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी खासगी रुग्णालयांप्रमाणे आम्हीही पैसे देतो, केंद्र सरकारने लस द्यावी - महापौर किशोरी...

खासगी रुग्णालयांप्रमाणे आम्हीही पैसे देतो, केंद्र सरकारने लस द्यावी – महापौर किशोरी पेडणेकर

महापालिका लस खरेदी करण्यासाठी पैसे देण्यास तयार

Related Story

- Advertisement -

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी केंद्र सरकार आणि आरोग्य यंत्रणा लढा देत आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार घातला आहे. कोरोनाच्या साथीला थोपवण्यासाठी कोरोनाप्रतिबंधक लस हा एकमेव उपाय आहे. सध्या देशात कोरोनाविरोधात लसीकरण सुरु आहे. परंतु अपुऱ्या लसीच्या पुरवठ्यामुळे लसीकरण करण्यामध्ये अडथळे येत आहेत. सरकारी लसीकरण लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे कोलडमले असताना खासगी रुग्णालयांत लसीकरण वेगात सुरु आहे. यावरुन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आम्हीही लसींच्या खरेदीसाठी पैसे देऊ आम्हाला लस पुरवठा करा अशी मागणी केली आहे.

केंद्र सरकार राज्य सरकारला ४५ वर्षांवरील नागिरकांचे लसीकरण करत आहे. तर राज्य सरकार १८ ते ४४ वर्षांमधील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून राज्य सरकारला लसीचा अपुरा पुरवठा केला जातो आहे. खासगी क्षेत्रात लसीकरण विनाअडथळा सुरु आहे. १००० ते १५०० रुपयांपर्यंत खासगी रुग्णालयात लसीकरण करण्यात येत आहे. केंद्र सरकार खासगी रुग्णालयांना पैसे घेऊन लस पुरवठा करत आहे. तसेच राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेला लस पुरवठा करण्यात यावा, यासाठी केंद्र सरकारला पैसे देऊ असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय

- Advertisement -

मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. खासगी रुग्णालयांकडून पैसे घेऊन केंद्र सरकार लस पुरवठा करत असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेलाही लसींचा पुरवठा करण्यात यावा, यासाठी आम्ही पैसे देऊ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एकरकमी चेकने पेसे देण्याची तयारी दर्शवली आहे.

आम्हाला लसीचा पुरवठा उपलब्ध झाल्यानंतर ती नागरिकांना मोफत देत आहोत. अगदी, गरीब, श्रीमंत असा भेदभाव न करता सर्वांना मोफत लसीकरण करण्यात येत आहे. महापालिका लस खरेदी करण्यासाठी पैसे देण्यास तयार आहे. केंद्र सरकारने आम्हालाही लसींचा पुरवठा करावा असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

- Advertisement -