घरमहाराष्ट्रसाकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पिडितेची महापौर किशोरी ताई पेडणेकरांनी घेतली भेट

साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पिडितेची महापौर किशोरी ताई पेडणेकरांनी घेतली भेट

Subscribe

मुंबईतील साकीनाका येथील खैरानी रोड परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ माजली असून संतापाचं वातावरण आहे.

मुंबईत निर्भया घटनेची पुनरावृत्ती करणारी संतापजनक घटना घडली आहे. ३० वर्षीय महिलेवर बलात्कार करुन आरोपींनी गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवीय आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईतील साकीनाका येथे ही घटना घडली. सदर घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त आणि अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान मुंबईच्या महापौर किशोरी ताई पेडणेकर यांनी देखील पिडीतेची भेट घेतली आहे. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने पिडीतेची प्रकृती गंभीर असल्याचे आरोग्य कर्मचारी पिडितेवर उपचार करत आहेत. साकीनाकामध्ये घडलेली ही घटना अत्यंत संतापजनक आहे. पिडीत महिला वेंटीलेटर आहे. पुरुषांमध्ये क्रुरता दिवसागणिक वाढत आहे. अशी क्रुरता का वाढत आहे असा सवाल किशोरी ताई पेडणेकर यांनी केला आहे. पीडितेचा प्रायवेट पार्टला प्रचंड दुखापत झाली असून रक्तस्त्राव होत आहे अशी माहती त्यांनी दिली आहे.

- Advertisement -

मुंबईतील साकीनाका येथील खैरानी रोड परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ माजली असून संतापाचं वातावरण आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे साडे तीनच्या सुमारास कंट्रोल रुमला साकीनाका येथील खैरानी रोडवर एक महिला रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध असल्याची माहिती देणारा फोन आला. दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त आणि अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी घटनास्थळी धाव घेतली.


हे हि वाचा – Ganeshostav 2021: आरक्षण असणाऱ्या प्रवाशांना तपासणीनंतरच स्थानकात प्रवेश – कोकण रेल्वे

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -