नाशिक : ऐन परीक्षेच्या दिवशी तासभर आधीच एमबीबीएस परीक्षेचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राज्यभरात गोंधळ निर्माण झाला आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाच्या फार्माकोलॉजी-1 विषयाचा पेपर परीक्षा सुरू होण्याच्या अगोदरच फुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (MBBS Secondyear exam goes viral on social media before exam.)
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा एमबीबीएस द्वितीय वर्षाचा फार्माकोलॉजी-1 विषयाचा पेपर मंगळवारी परीक्षेच्या तासभर आधीच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विद्यापीठाला याबाबत माहिती मिळताच हा पेपर रद्द करून या विषयाची फेरपरीक्षा 19 डिसेंबरला ठेवण्यात आली आहे. तसेच आता या प्रकरणाच्या पुढील चौकशीसाठी विद्यापीठ स्तरीय समिती नेमण्यात आल्याचे आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने सांगण्यात आले आहे. तसेच सायबर सेलच्या मदतीने ईमेलचा स्त्रोत शोधण्याचे काम सुरू आहे. कुलगुरूंनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकारामुळे 2 डिसेंबरची परीक्षा रद्द करण्यात आली असून आता या विषयाची फेरपरीक्षा 19 डिसेंबर 2024 रोजी होणार आहे.
हेही वाचा :IND VS UAE U19 : वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेची अर्धशतके; भारतीय संघाची उपांत्य फेरीत धडक
या पेपरसाठी राज्यभरातील 50 केंद्रांवर जवळपास 7,900 विद्यार्थी परीक्षेला बसणार होते. ऐन परीक्षेच्या दिवशी तासभर आधी MBBS परीक्षेचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परीक्षा व्यवस्थेच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. पेपर फुटीमागील कारण शोधण्यासाठी विद्यापीठाने उच्चस्तरीय तपास समिती स्थापन केली असून सायबर सेलच्या मदतीने ईमेलचा स्त्रोत शोधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. कुलगुरूंनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच परीक्षेच्या तासभर आधी थेट सोशल मीडियावर पेपर व्हायरल झाल्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला फेर परीक्षेची नामुष्की ओढवली आहे.
Edited By Komal Pawar Govalkar