गोवरचा विळखा आता तरुणांनाही, मुंबईत आढळले दोन संशयित रुग्ण

ज्या भागांमध्ये गोवरच्या संशयित रुग्णांमध्ये अंगावर पुरळ, ताप अशी लक्षणं दिसून येतात. अशा परिसरातील पाच नमुने वैद्यकीय विश्लेषणासाठई पाठवण्यात येतात. मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये पाचपैकी दोन नमुन्यांमध्ये गोवर असल्याचे निष्पन्न झाल्यास या परिसरात गोवरचा उद्रेक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेकडून घोषित केलं जातं, असं तज्ज्ञांकडून सांगण्यात येतंय.

मुंबई – मुंबईत लहान मुलांमध्ये गोवरचा (Measles in Youth) विळखा वाढत असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. वय १८ आणि २२ वर्षांमधील तरुणांमध्ये गोवरची लक्षणे (Measles Symptoms) आढळली आहेत. या संशयित रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून मुंबई महापालिकेकडून (BMC) काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा -गोवरला रोखण्यासाठी लसीकरणावर भर; दररोज १५० कॅम्प घेण्याचे आदेश

मुंबई एम पूर्व प्रभागामध्ये राहणारे १८ आणि २२ वर्षांच्या दोन रुग्णांमध्ये गोवरसदृष लक्षणं आढळली आहेत. त्यामुळे या दोन संशयित रुग्णांची नोंद महापालिकेकडे करण्यात आली आहे. अंगावर पुरळ आणि ताप आल्यामुळे हे दोन्ही रुग्ण खासगी डॉक्टरांकडे गेले होते. डॉक्टरांनी त्यांच्यावर औषधोपचार केले असून त्यांना जीवनसत्त्व अ देण्यात आले आहे.

ज्या भागांमध्ये गोवरच्या संशयित रुग्णांमध्ये अंगावर पुरळ, ताप अशी लक्षणं दिसून येतात. अशा परिसरातील पाच नमुने वैद्यकीय विश्लेषणासाठई पाठवण्यात येतात. मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये पाचपैकी दोन नमुन्यांमध्ये गोवर असल्याचे निष्पन्न झाल्यास या परिसरात गोवरचा उद्रेक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेकडून घोषित केलं जातं, असं तज्ज्ञांकडून सांगण्यात येतंय.

हेही वाचा -शिळ आणि कौसा येथे सापडले गोवरचे बाधित रुग्ण

मुंबईत गोवरचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे संशयित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून गेल्या दोन – अडीच महिन्यात ९ निष्पाप मुलांचा बळी या आजाराने घेतला आहे. त्यामुळे आता ‘गोवर’ मुळे कोविडसारखी भयंकर परिस्थिती ओढविण्यापूर्वी गोवरला रोखण्यासाठी गरोदर महिला व लहान मुलांच्या लसीकरणावर भर देण्याचा आणि त्यासाठी ठिकठिकाणी दररोज किमान १५० कॅम्प आयोजित करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. ‘गोवर’ आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी त्यांच्या कुटुंबातील ९ महिने आणि ५ वर्षे वयोगटातील मुलांना गोवर प्रतिबंधात्मक लस दिली नसल्यास तातडीने द्यावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.