घरताज्या घडामोडीमुंबईसह ठाण्यात गोवरचा प्रादूर्भाव, राज्यभरात 10 हजार 234 संशयित रुग्ण

मुंबईसह ठाण्यात गोवरचा प्रादूर्भाव, राज्यभरात 10 हजार 234 संशयित रुग्ण

Subscribe

मुंबई, ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात गोवरचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. संपूर्ण राज्यभरात आतापर्यंत 10 हजार 234 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. तर 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गोवरची लागण झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने रुग्णांची संख्या वाढू शकते, या पार्श्वभूमीवर हे संक्रमण रोखण्यासाठी महापालिकांकडून विविध उपाय योजना राबविण्यात येत आहेत. तसेच गोवरचे संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाकडून लसीकरण वाढविण्यात येणार आहे.

मुंबईमध्ये 3 हजार 831 इतक्या संशयित रुग्णांची संख्या आढळून आली आहे. तसेच यामध्ये बाधित रुग्णांची संख्या 260 इतकी आहे. तर 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये 10 वॉर्ड हे गोवर प्रभावित असून एम इस्ट वॉर्डमध्ये 6, एल वॉर्डमध्ये 5 तर एच ई आणि एम डब्लू वॉर्डात प्रत्येकी 2 उद्रेक झाले आहेत.

- Advertisement -

ठाणे शहरांमध्ये गोवरचे 44 रुग्ण आढळले असून 303 संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. ठाणे जिल्ह्यात 15 रुग्ण, वसई विरार मनपा 11, पनवेल मनपा 5, नवी मुंबई मनपा 12, मालेगाव मनपा 62, भिवंडी मनपा 46 इतके संशयित रुग्ण आढळून आले आहेत.

- Advertisement -

आरोग्य विभागाकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून शून्य ते पाच वर्षे वयापर्यंतच्या मुलांना गोवर प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे की नाही याची माहिती घेण्यात येत आहे. दरम्यान, देशभरात बिहार, गुजरात, हरियाणा, झारखंड, केरळ आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये गोवरचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर 23 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय स्तरावर या विषयातील तज्ञांची बैठक झाली. या बैठकीनंतर भारत सरकार मार्फत पुढील सूचना देण्यात आल्या आहेत.


हेही वाचा :हा छत्रपती शिवरायांचा अपमान नाही का?, उदय सामंतांचा ट्वीटद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसला


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -