घरमहाराष्ट्रमुंबईत गोवरचा विळखा घट्ट, मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

मुंबईत गोवरचा विळखा घट्ट, मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

Subscribe

गोवरचा वाढता प्रादुर्भाव पाहता पालिकेने कस्तुरबा रुग्णालयात विशेष कक्षाची स्थापना केली आहे. सध्या या रुग्णालयात यशस्वी उपाचारानंतर २९ रुग्णांना घरी पाठविण्यात आले आहे. तर ८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ४ रुग्ण ऑक्सीजनवर आहेत. तर १ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे, अशी माहिती पालिका आरोग्य खात्याकडून देण्यात आली आहे.

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह अनेक शहरांत गोवरचा (Measles) विळखा अधिक घट्ट होताना दिसतोय. गोवरवर वेळीच आळा घालता यावा याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला सार्वजनिक आरोग्य खात्याचे सचिव यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा – मुंबईत गोवर रुग्णसंख्या १८४; संशयित रुग्णसंख्या १,२६३

- Advertisement -

मुंबईमध्ये गेल्या दोन महिन्यात आठ ठिकाणी गोवरचा प्रादुर्भाव वाढला आहे. बुधवारपर्यंत गोवर रुग्णांची संख्या १८४ एवढी झाली आहे. संशयित रुग्णांची संख्या १,२६३ एवढी नोंदविण्यात आली आहे. तर गोवर बाधित ७ रुग्णांचा संशयित मृत्यू झाला आहे. गोवरच्या आजाराने मुंबईकर चिंतातूर झाले आहेत. पालिका आरोग्य खाते चांगलेच कामाला लागले आहेत.

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे. मंत्रीमंडळ बैठक झाल्यानंतर ही बैठक होणार आहे. यामध्ये गोवर आजाराच्या प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत. तसंच, संबंधित सूचनाही ते अधिकाऱ्यांना देणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – ठाण्यात गोवर साथीने पसरले हातपाय, दीड महिन्यात आढळले ५२ रुग्ण

मिळालेल्या माहितीनुसार, गोवरचा वाढता प्रादुर्भाव पाहता पालिकेने कस्तुरबा रुग्णालयात विशेष कक्षाची स्थापना केली आहे. सध्या या रुग्णालयात यशस्वी उपाचारानंतर २९ रुग्णांना घरी पाठविण्यात आले आहे. तर ८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ४ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. तर १ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे, अशी माहिती पालिका आरोग्य खात्याकडून देण्यात आली आहे.

१ ते ४ वर्ष वयोगटातील ८७ रुग्ण

गोवर बाधित १८४ रुग्णांमध्ये, ० ते ८ महिन्याचे २५ रुग्ण, ९ ते ११ महिन्याचे २८ रुग्ण, १ ते ४ वर्ष ८७ रुग्ण, ५ ते ९ वर्षे ३० रुग्ण , १० ते १४ वर्षे १० रुग्ण, १५ आणि त्यावरील वयोगटातील ४ रुग्णांचा समावेश आहे. तसेच, ताप व पुरळ आलेले १,२६३ संशयित रुग्ण आहेत. त्यामध्ये, ० ते ८ महिन्याचे १५७ रुग्ण, ९ ते ११ महिने १६६ रुग्ण, १ ते ४ वर्ष ६४७ रुग्ण, ५ ते ९ वर्षे २१७ रुग्ण, १० ते १४ वर्षे ६० रुग्ण, १५ आणि त्यावरील वयोगटातील १६ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत अतिरिक्त सत्रात ११ हजार ८१० मुलांचे आणि गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात आले आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -